आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय सामाजिक

दिल्लीत वकील-पोलीस संघर्ष पेटला

दिल्ली;- तीस हजारी न्यायालयाबाहेर पोलीस आणि वकिलांमध्ये झालेल्या संघर्षानंतर हे प्रकरण अधिकच तापले आहे. याचपार्श्वभूमीवर मंगळवारी दिल्ली पोलिसांनी वकिलांविरोधात पोलीस मुख्यालयाबाहेर आंदोलन छेडले. वकिलांना विरोध दर्शवण्यासाठी पोलीस हातावर काळ्या पट्टया बांधुन आंदोलन करत आहेत.

आमच्याबरोबर अन्याय होत आहे. जे योग्य नाही. पण तरीही आम्ही शांततेत निषेध करणार असून आयुक्तांबरोबर चर्चा करणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलिसांना योग्य वागणूक मिळावी. त्यांनाही कायद्यानुसार समान शिक्षा मिळायला हवी. अशा आपल्या मागण्या असल्याचे येथील एका पोलिसाने सांगितले. गेल्या तीन दिवसांपासून वकील पोलिसांसोबत, सामान्यनागरिकांबरोबर गैरवर्तण करत आहेत. असे एकाने सांगितले.

दरम्यान. शनिवारी तीस हजारी न्यायालयात पोलीस व वकील यांच्यात तुफान हाणामारी झाली होती. हे प्रकरण इतके वाढले की पोलिसांना हवेत फायरिंग करावी लागली. त्यामुळे वकील अधिकच चवताळले व त्यांनी पोलिसांच्या जीपसह अन्य वाहने पेटून दिली. त्यानंतर दगडफेकही केली. तीस हजारी न्यायालयात जाण्यास एका वकिलाला पोलिसांनी अडवले होते. त्यानंतरच दोन्ही गट आमने सामने येऊ लागले आहेत.
—————

0