आंतरराष्ट्रीय

मुंबईत सर्व प्रथम नवरात्रौत्सव विक्रोळीची दुर्गामाता पाटपूजन सोहळा

अविनाश माने (मुंबई प्रतिनिधी)

    गणपती बाप्पाच्या आगमनाआधीच मुंबईत सर्वात प्रथम विक्रोळीची दुर्गामातेचा पाटपूजन सोहळा ही माहिती मिळताच सोशल मीडिया वर एकच पोस्ट सतत पहायला मिळत आहे. विक्रोळीचा दुर्गामातेचा पाटपूजन सोहळा तसेच विक्रोळीची दुर्गामाता सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्या वतीने एक पोस्ट करण्यात आली आहे. विक्रोळीची दुर्गामाता पाटपूजन सोहळा असे पोस्टर तयार करण्यात आले व सोशल मीडियावर पोस्ट केले गेले व सर्व दुर्गामाता भक्तांनी तोच पोस्टर प्रोफाईल फोटो ठेवला असे चित्र सोशल मीडियावर दिसत आहे. दुर्गामातेच्या पाटपूजनाची आतुरता या भक्तांमध्ये दिसून येत आहे.
विक्रोळीची दुर्गामाता सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्या वतीने दुर्गामाता पाटपूजन सोहळा रविवारी 2 सप्टेंबर सायंकाळी 4 वाजता श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून आयोजित केले गेले असल्याची माहिती मंडळाचे सदस्य अविनाश माने यांनी दिली आहे.
यावेळी मुंबईतील नावाजलेले एलिगन्स इवेन्टचे मालक अंकित बदेका यांच्या लाईट्स व म्यूझिकच्या प्रदर्शनाने रसिकांचे डोळे दीपणार आहेत. तसेच मुंबईतील नावजलेले असे गर्जना ढोलताशा पथक, एकलव्य ढोलताशा पथक, जय मल्हार म्यूझिकल ग्रुप, पँथर बिट्स, संजू साउंड हे त्यांच्या अप्रतिम सुरांच्या तालावर दुर्गाभक्तांना नाचविणार आहेत. त्याच बरोबर नागपूरे आर्ट यांचीही भव्य सजावट समस्त भक्तांना पहायला मिळणार आहे. तसेच मुंबईतील तमाम बाळ गोपाळ गोविंदा पथके थरांचे मनोरे रचून विक्रोळीच्या दुर्गामातेला मानवंदना देऊन दहीहंडी फोडण्यास सज्ज राहणार आहेत. हा उत्सव विक्रोळीतील कन्नमवार नगर-2 दुर्गामाता मैदान या ठिकाणी पारंपरिक पध्दतीने पार पडणार आहे.
परिसरातील सर्व नागरिकांनी धार्मिक आणि पारंपारिक सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन विक्रोळीची दुर्गामाता सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचे अध्यक्ष निमेश पारकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

0