गुन्हा जळगांव

नगरदेवळ्याच्या तलाठ्यासह कोतवालाला ५ हजारांची लाच घेताना अटक

जळगाव ;– अवकाळी पावसाने कपाशी आणि मका पिकांचे नुकसान झाल्याने त्याचे पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याच्या बदल्यात ५ हजारांची लाच स्वीकारताना आज नगरदेवळ्याच्या तलाठ्यासह कोतवालाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली . याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , तक्रारदाराने दिलेल्या तक्रारी नुसार तक्रारदार यांचा शेती व्यवसाय असून त्यांच्या शेतात मका व कपाशी पीक लावलेले होते, अवकाळी पावसामुळे सदर पिकाचे झालेले नुकसान भरपाईचा पंचनामा करून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे नगरदेवळा,ता.पाचोराचे तलाठी मिलींद जयवंत बच्छाव, वय- 55 वर्षे, कोतवाल विलास उर्फ कैलास काशिनाथ धिवरे, वय-45,यांनी तक्रारदाराकडून ५ हजारांची मागणी केली होती . लाचलुचपत विभागात तक्रार दिल्यानंतर जळगावच्या एसीबीच्या पथकाने वरील दोघांना लाच स्वीकारताना अटक केली .
यांनी केली कारवाई
पोलीस उप अधिक्षक जी.एम.ठाकुर, पोलीस निरीक्षकसंजोग बच्छाव,सफौ.रविंद्र माळी, पोना.मनोज जोशी, जनार्दन चौधरी,पोकॉ.प्रशांत ठाकुर, पोकॉ. नासिर देशमुख, पोकॉ.महेश सोमवंशी,

0