मुंबई राजकीय

ब्रेकिंग न्यूज … मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला राजीनामा

3133अडीच वर्षांचा  निर्णय  झालाच नव्हता ; उद्धव ठाकरेंनी फोन उचललाच नाही
मुंबई ;-गेल्या काही दिवसांपासून सेना भाजपामध्ये सत्तास्थापनेचा तिढा सुरु असून तो अजूनही सुटला नसला तरी आज भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे देऊन तो राज्यपालांनी स्वीकारला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली . या राजीनाम्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
यावेळी बोलताना तेम्हणाले कि लोकांनी महायुतीला मतदान केले होते. आमचे सर्व पर्याय खुले आहे असे सेनेचे नाव न घेता म्हटले कि मी पहिल्या पत्रकार परिषदेत महायुतीचे सरकार स्थापन होईल असे सांगितली होते. उद्धव ठाकरे यांचे आभार मानले होते. अडीच वर्षाच्या विषयावर निर्णय झालेला नव्हता . अडीच वर्षांचा निर्णय एकदा फिस्कटला होता . निर्णय झालेला नाही . अमित शाह आणि उद्धव यांना हा अडीच वर्षांचा निर्णय झाला का हे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केली असता त्यांनीही कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सांगितले . उद्धव ठाकरेंशी फोनवर संपर्क केले मात्र ते त्यांनी घेतले नाही . चर्चेची खुली द्वारे आमच्याकडून होती . मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी चर्चा करायला सेनेला वेळ होता . आमच्याशी नव्हता अशी खंत मुख्यमंत्र्यानी व्यक्त केली . ज्यांच्याविरोधात मते मागितली त्यांच्याशी सेना चर्चा करीत होती . चर्चचे हे धोरण स्वीकारले ते योग्य नाही . त्यांच्या आजूबाजूचे लोक आहेत ते ज्याप्रकारची वक्तव्ये करीत आहे दरी माजविण्याचा काम केले जात होते . आम्ही उत्तरे देण्यास सक्षम असून आम्ही जोडणारी लोक असून तोडणारी नाहीत अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्र्यानी मांडली . मागील निवडणुकीवेळी आम्ही वेगवेगळे लढलो त्यावेळी मोदी अथवा मी किंवा आमच्या नेत्यांनी कधीच टीका केली नाही . विरोधात असताना टीका होणे साहजिक आहे .टीका करणे आम्हाला मान्य नाही . मोदींवर टीका मित्रपक्ष करीत असतील तर आम्हाला मनाला लागलेली हि गोष्ट आहे. सोबत राहणार असलो तर मोदींविरुद्ध टीका करणे आम्हाला मान्य नाही .

2+