उत्तर महाराष्ट्र जळगांव

जय श्रीरामाच्या जयघोषात रथोत्सवास उत्साहात प्रारंभ

हजारो भाविकांनी घेतले दर्शन ; श्रीराम मंदिर संस्थानच्या रथोत्सवाला 147 वर्षाची परंपरा कायम

जळगाव ;- नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानतर्फे 147 वर्षाची परंपरा कायम ठेवून कार्तिक प्रबोधिनी एकादशीनिमित्त आज .8 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत रथोत्सव साजरा करण्यात आला . प्रभू श्रीरामचंद्र कि जय च्या जयघोषात परिसर दणाणून गेला होता . यावेळी हजारो नागरिकांनी उपस्थित राहत रथाचे दर्शन घेतले .

पहाटे 4 वाजता काकडारती, प्रभु श्रीरामांच्या उत्सवमुर्तीस महाभिषेक, सकाळी 7 वाजता महाआरती,सकाळी 7.30 ते 8.30 सांप्रदायिक परंपरेचे भजन आदी धार्मिक कायर्कर्म बरह्मवृंदांच्या उपस्थितीत झाले. त्यानंतर सकाळी ११ वाजेला श्रीराम मंदिर संस्थानच्या प्रांगणात संस्थानचे प्रमुख विश्‍वस्त मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते आणि शहरातील समस्त ब्रह्मवृंद मंडळीच्या वेद मंत्राच्या घोषात पूजेस प्रारंभ झाला. प्रारंभी शांतीपाठ, गणेश गरुड, मारुती देवता पूजन, रथचक्र पूजन, रथास कोहळे आदी फळे अर्पण करून प्रभू श्रीरामाच्या रथाची महापूजा होऊन सुरवात झाली. दुपारी बाराला रथाची महाआरती झाली. यावेळी आमदार सुरेश भोळे, आमदार चंदुलाल पटेल, महापौर सिमा भोळे, आयुक्‍त डॉ. उदय टेकाळे, रथोत्सव समितीचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, पोलिस पाटील प्रभाकर पाटील आदी उपस्थित होते.

मंगेश महाराज यांच्या हस्ते श्रीराम रथाची महाआरती होवून संस्थानतर्फे उपस्थित प्रमुख अतिथी व रथोत्सवाचे मानकरी, सेवाधारी यांचा सत्कार करण्यात आला . . त्यानंतर श्रीराम रथावर आरूढ होणारी प्रभू श्रीरामचंद्रांची उत्सवमूर्तीची आरती होवून रथावर मुर्तीविराजमानकरण्यात आली . .रथावर गरूड,मारुती,अर्जुन,दोनघोडे,इ.मुर्त्या तसेच पुष्पहारांनी सजवलेल्या श्रीराम रथाच्या दिंडी सोहळ्यास प्रभु श्रीरामांच्या जयघोषात प्रारंभ करण्यात आला . रथाचे अग्रभागी समई,नगारा वादन,चौघडा,झेंडेकरी,बँन्डपथक,वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ,वावडडा, गुरूदत्त भजनी मंडळ पाथरी,श्रीराम भजनी महिलामंडळ,पाडळी,बुलढाणा,मंडाबाई भजनी मंडळ व श्रीराम भजनी मंडळ,मेहरूण,तसेच आसपासचे खेडयावरीलभजनी मंडळी,श्री संत मुक्ताबाईच्या पादुका असलेली पालखी व त्यामागे श्रीरामरथ,असा भव्यदिव्य जलग्रामनगरदिंडी प्रदक्षिणा रथयात्रेस मिरवणुकीस सकाळी 12 वाजता श्रीराम मंदिर येथून प्रारंभ करण्यात आला.

0