उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

कामावरून घरी परतणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला कंटेनरची धडक

तरुण जागीच ठार ; जळगाव विमानतळाजवळील घटना

जळगाव : कामावरुन घरी परत जात असताना समोरुन भरधाव वेगाने येत असलेल्या कंटनेरने दुचाकीला धडक दिल्याने त्यात गोपाळ शांताराम पाटील (३८, रा.धानवड, ता.जळगाव) हा तरुण जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री ११ वाजता घडली. विमानतळाजवळ हा अपघात झाला. दरम्यान, अपघातानंतर तासभर मृतदेह जागेवरच पडून होता.
सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , गोपाळ पाटील हा तरुण चारचाकी वाहनावर चालक म्हणून कामाला होता. रोज रात्री १० ते ११ वाजता काम संपल्यानंतर तो दुचाकीने धानवड येथे जात होता. शनिवारी घरी जात असताना विमानतळाजवळ समोरुन भरधाव वेगाने येणाºया कंटनेरने दुचाकीला जोरदार धडक दिली.त्यात गोपाळ जागीच ठार झाला. कंटेनर चालक मद्याच्या नशेत होता, पळून जात असताना लोकांनी त्याला कुसुंबा गावाजवळ पकडले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक गणेश सोनवणे यांनी सहकाºयांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली. तेथून रुग्णवाहिका व पोलिसांशी संपर्क केला. त्यानंतर मृत गोपाळचा मोठा भाऊ नवल पाटील, गावातील भाऊसाहेब पाटील व इतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथून रात्री १२.१५ याजता मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. पोलिसांनी कंटेनर व चालकाला ताब्यात घेतले आहे.
गोपाळ याच्या पश्चात आई मनकर्णाबाई, वडील शांताराम देवबा पाटील, पत्नी वर्षा, भाऊ नवल, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.
——————————

0