उत्तर महाराष्ट्र जळगांव सामाजिक

अरूश्री हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिरास प्रतिसाद

जळगाव : स्व. डॉ. अविनाश आचार्य जयंतिनिमित्त महार्षी व्यास युवा शक्ती बहुउद्देशिय संस्था, ७१ गृप वाल्मिक नगर यांच्यातर्फे रिंगरोडवरील अरुश्री हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील दात्यांनी ३१ बाटल्या रक्तदानकरुन शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी गोळवलकर रक्तपेढीचे जितेंद्र शाह व स्टाफ ७१ गृप, महर्षी व्यास कार्यकर्ते., अरुश्री हॉस्पिटल कर्मचाऱ्यासह डॉ. परिश्रित बाविस्कर, श्रीराम बाविस्कर, सेवानिवृत अधिकारी प्रभाकर सोनवणे, शैलेश सोनवणे, योगेश बाविस्कर, विजय पाटील, डॉ. शाहदाब शेख, योगेश सपकाळे, ललित पाटील, सुमित मराठे, राजु नन्नवरे, अश्विन शंकपाळ, जितेंद्र सोनवणे, बाळू रायसिंग आदींनी परिश्रम घेतले.

0