उत्तर महाराष्ट्र जळगांव

संशोधनासाठी रिमोट सेंटरचा विद्यार्थ्यांना फायदा: प्राचार्य सिंह

गाडगेबाबा अभियांत्रिकीत ओपन सोर्स सॉफ्टवेयर आरकार्यशाळा

जळगाव ; आर्थिक, सामाजिक उन्नती आणि विकासामध्ये उद्योग, व्यापार, व्यवसायांचे महत्त्व, योगदान मोठे आहे. उद्योग निर्माण करणाऱ्या उद्योजकाच्या, उद्योजकतेतूनच देशाची आर्थिक प्रगती होते. उद्योजक उद्योग सुरू करतो, अनेकांना रोजगार देतो. आर्थिक व्यवहारातून, समाज, सरकार यांना कररूपाने एकंदर सामाजिक व्यवस्था चालवण्याकरिता आर्थिक मदत करतोच; पण समाजातील अनेकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने त्यांचा उदरनिर्वाह करण्याकरिता मदत करतो. उद्योजक संपत्ती निर्माण करतो व हीच संपत्ती देशाला समृद्ध, सुरक्षित व सक्षम बनवते, आणि या उद्योगांचा पाया रोज येणाऱ्या नवीन तंत्रज्ञानावावर अवलंबून असतो म्हणून या तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांना सहज रित्या करता यावा त्यासाठी महाविद्यालयात दर सहा महिन्यांनी प्राध्यापकांना प्रशिक्षण दिले जाते अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी आज दिनांक ९ नोव्हेंबर रोजी “आर” फ्री / लिबर अँड ओपन सोर्स सॉफ्टवेयर एकदिवसीय कार्यशाळेत दिली.

संशोधनासाठी रिमोट सेंटरचा विद्यार्थ्यांना फायदा: प्राचार्य सिंह
नव्याने होणारे प्रयोग, तंत्रज्ञान, त्यावर आधारित नवे उद्योग, स्वयंरोजगार यांची आमंलबजावणी करण्यासाठी, संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना रिमोट सेंटरमधून उपयुक्त माहिती मिळते. दरम्यान या प्रक्रियेत कोणतीही अडचण अथवा समस्या उभ्या राहिल्या तर सेंटर मध्ये असणाऱ्या तज्ज्ञ, अभ्यासक यांची मदत त्यास मिळते. अभ्यासातील विषयांसह सेंटरमध्ये सुरू असणारे प्रयोग, नवे तंत्रज्ञान, नव्याने रचले जाणारे उद्योग याची माहिती विद्यार्थ्यांना दररोज शिकता येते, अपडेट राहण्यासाठी विद्यार्थ्यांना एक उत्तम मार्ग मिळाला आहे अशी माहितीही प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी दिली.
भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन प्रायोजित केलेल्या आयआयटी मुंबईच्या माध्यमातून २८ प्राध्यापकांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला.

ओपन सोर्स सॉफ्टवेयर समस्या सोडवण्यासाठी प्रभावी: प्रा.राममोहन अग्रवाल
आर हे एक फ्री / लिबर अँड ओपन सोर्स सॉफ्टवेयर (एफएलओएसएस) आहे. सुव्यवस्थित आणि अत्याधुनिक पॅकेज – जे डेटा विश्लेषण, मॉडेलिंग, चाचणी आणि अंदाज लावण्यास सुलभ करते. सांख्यिकी समस्या सोडविण्यासाठी प्रभावी असून आर ची क्रॉस-प्लॅटफॉर्म सुसंगतता आणि मोठ्या आणि जटिल डेटा सेट्सची हाताळणी करण्याची क्षमता शैक्षणिक शास्त्रज्ञांसाठी त्यांच्या प्रयोगशाळांमध्ये डेटाचे विश्लेषण करण्याचे एक आदर्श साधन बनवते. आर साध्या गणना, मॅट्रिक्स गणना, भिन्न समीकरणे, ऑप्टिमायझेशन, सांख्यिकीय विश्लेषण, प्लॉटिंग आलेख इत्यादींसाठी देखील वापरला जाऊ शकतो. तसेच ज्या कोणालाही व्यापक सांख्यिकीय गणने आणि डेटा व्हिज्युअलायझेशन करण्याची इच्छा असेल त्यांना उपयुक्त आहे अशी माहिती कार्यशाळा प्रमुख प्रा.राममोहन अग्रवाल यांनी दिली.
प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, विभाग प्रमुख डॉ.गिरीश कुळकर्णी, प्रा.अविनाश पाटील, प्रा.दिनेश पाटील, कार्यशाळा प्रमुख प्रा.राममोहन अग्रवाल, रिमोट सेंटर प्रमुख प्रा.गजानन पाटील यांची उपस्थिती होती.

0