उत्तर महाराष्ट्र जळगांव मुंबई व्यवसाय सामाजिक

जळगावात उद्यापासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

777प्रदर्शनाची तयारी पूर्ण ; प्रदर्शनात २१० हून अधिक स्टॉल्स

जळगाव,;– येथील शिवतीर्थ मैदानावर 15 (शुक्रवारी) ते 18 नोव्हेंबर दरम्यान अॅग्रोवर्ल्डचे चार दिवसीय राज्यस्तरीय कृषी व दुग्ध प्रदर्शन होत आहे. प्रदर्शनात शेती उपयोगी यंत्र, तंत्र, सिंचन प्रणाली, नामांकित कंपन्यांची ट्रॅक्टर व अवजारे, स्प्रे- पंप, फळबाग छाटणीपासून ते परसबागेतील मशागतीसाठी उपयुक्त शेती साहित्य, दूध काढणी यंत्र, करार शेतीची माहिती यासह इतर माहितीचा खजिनाच यात असणार आहे.

प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली आहे. तब्बल चार एकर क्षेत्रावर होत असलेल्या या प्रदर्शनात २१० हून अधिक स्टॉल्स असणार आहेत. शिवाय प्रात्यक्षिकांवर भर देण्यात आला असून शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन अॅग्रोवर्ल्डचे आयोजक शैलेंद्र चव्हाण यांनी केले आहे.

अॅग्रोवर्ल्डच्या या कृषी प्रदर्शनाचे जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. मुख्य प्रायोजक असून, प्लॅन्टो कृषीतंत्र, कुमार बायोसीड्स, श्री साईराम प्लास्टिक, क्वालिटी ड्रीप इरिगेशन, ग्रब अॅग्रो, गोदावरी फाउंडेशन व इंबी जलसंचय हे सहप्रायोजक आहेत.

प्रदर्शनस्थळी ट्रॅक्टर्स, अवजारे व मशिनरी स्वतः हाताळून खात्री करण्यासाठी स्वतंत्र जागा राखीव ठेवली आहे. त्याचाही लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे. याशिवाय पशुपालकांसाठी हिरव्या चाऱ्यासाठीचे व्यवस्थापन, मूरघास, हायड्रोपोनिक फॉडर, अॅझोलाची प्रात्यक्षिकासह माहिती देण्याची व्यवस्था आहे. दूध काढणी यंत्रांच्या नामांकित कंपन्यांचेही स्टॉल्स याठिकाणी असणार आहेत. या कृषी प्रदर्शनात खास आकर्षण भारतातील सर्वात मोठा बैल असणार आहे. बैलाचे वजन १ टन असून, लांबी १० फूट तर उंची ६ फूट आहे. शेतकऱ्यांनी प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बागायती, कोरडवाहू तसेच संरक्षित शेतीतील उपायांवर मंथनही घडवून आणले जाते. कृषी संशोधन व शिक्षण संस्था, बँका, बियाणे, खते, कीटकनाशके, हार्वेस्टिंग यंत्रे, कापणी यंत्रे, प्रक्रिया उद्योग, ड्रीप, टिश्यूकल्चर क्षेत्रातील नामवंत कंपन्या या प्रदर्शनात सहभागी आहेत. त्याचबरोबर ऑटोमोबाईल्स, डेअरी, पशुसंवर्धन, नर्सरी, कृषी प्रक ाशने, अपारंपरिक ऊर्जा साधनांचेही स्टॉल्स प्रदर्शनात असतील. नवतंत्रज्ञानाचा विचार करून पॉलीहाऊस, शेडनेट, मल्चिंग, विविध आकारातील शेततळे, गांडूळ शेती अशा बाबी प्रदर्शनस्थळी मांडण्यात येणार आहेत.

1+