उत्तर महाराष्ट्र जळगांव सामाजिक

बच्चीबाई ट्रस्टतर्फे मोफत डोळे व दात तपासणी शिबिराचे आयोजन

जळगाव ;- येथील बच्चीबाई ट्रस्टतर्फे मोफत डोळे व दात तपासणी शिबिराचे आयोजन १७ रोजी सदोबा वेअर हाऊससमोर इच्छादेवी चौक येथे सकाळी ९ ते ११ यावेळेत आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात गरजू गरीब जनतेसाठी मोफत तपासणी शिबीर आणि फेको शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे . तसेच मोतीबिंदू ,काच बिंदू , तिरळेपणा ,नासूर आदी रोगांचे निदान करण्यात येणार आहे. याशिवाय दातांच्या विविध समस्या व उपचार करण्यात येणार आहे. डोळ्यांची तपासणी डॉ. एमपी उदासी तर दातांची तपासणी डॉ. विक्रम उदासी करणार आहेत . सर्वानी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

0