आंतरराष्ट्रीय शिक्षण सामाजिक

सात वर्षांच्या मुलीने साकारलं गुगल डुडल ; गुगलकडून बालदिनाच्या खास शुभेच्छा

नवी दिल्ली;- संपूर्ण देशभरात आज बालदिन साजरा केला जात आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांचा जन्मदिवस हा बालदिन म्हणून साजरा केला जात असतो. या बालदिनानिमित्ताने गुगलनंही डुडलच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे हे डुडल सात वर्षांच्या विद्यार्थिनीकडून साकरण्यात आले आहे. गुगलकडून बालदिनानिमित्त दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी एका स्पर्धा आयोजित केली जाते. त्यामधून एक बेस्ट डुडल गुगलच्या होम पेजसाठी निवडलं जातं. या वर्षीचं डुडल गुरुग्राम येथील दिव्यांशी सिंघलनं साकारले आहे.

गुगलने घोषित केलेल्या या स्पर्धेमध्ये ‘When I grow up, I hope…’हा विषय डुडल बनवण्यासाठी देण्यात आला. यामध्ये सात वर्षांच्या दिव्यांशीनं ‘वॉकिंग ट्री’ या संकल्पनेवर आधारित डुडल रेखाटले आहे. डुडलमध्ये तिने झाडे चालताना दाखवली आहेत. विशेष म्हणजे तिच्या चित्रामध्ये तिनं झाडांना बूटं देखील घातली आहेत. पुढच्या पिढीपर्यंत जंगलांचे व झाडांचे महत्त्व पोहोचायला हवे हा त्या मागचा उद्देश. गेल्या दहा वर्षांपासून गुगलकडून या एकप्रकारे चित्रकला स्पर्धेच आयोजन केले जाते. अनेक विद्यार्थीही या स्पर्धेत सहभाग घेतात.भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्म दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो.

0