उत्तर महाराष्ट्र क्रिडा जळगांव

अनुभूती स्कूलची निकिता गौतम सोनवणेची शालेय राज्यस्तर कॅरम स्पर्धेसाठी निवड

जळगाव:- येथील अनुभूती स्कूलची इयत्ता ८ वी ची विद्यार्थीनी निकिता गौतम सोनवणे हिची १४ वर्षाआतील गटात तिची निवड झाली आहे.
 १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान डेरवण जिल्हा रत्नागिरी येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तर स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
तिला शाळेचे क्रीडा शिक्षक संजय पाटील,श्वेता कोळी, कॅरम प्रशिक्षक आयेशा साजिद मोहम्मद, वसीम शेख ,सय्यद मोहसीन यांचे प्रशिक्षण लाभले.
तिच्या यशाबद्दल  जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन जैन स्पोर्टसचे अध्यक्ष अतुल जैन, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, प्राचार्य रश्मी लाहोटी यांनी अभिनंदन केले आहे.
0