उत्तर महाराष्ट्र जळगांव शिक्षण

विद्यापीठात साहित्य सृजन भित्तीपत्रकाचे विमोचन

जळगाव;– कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रात समतेचा संदेश देणाऱ्या संत तुकारामांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या साहित्य सृजन भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले.
भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रातील विद्यार्थ्यांकडून या भित्तीपत्रकाचे लेखन करण्यात आले आहे. याप्रसंगी औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी विभाग प्रमुख प्रा.डॉ.ए.जी.खान, कवी समीक्षक डॉ.महेंद्र भवरे यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी प्रशाळेचे संचालक प्रा. म.सु.पगारे हे होते.
या प्रसंगी डॉ खान म्हणाले की, संतांनी सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. तर भित्तीपत्रकाचे विमोचन करतांना डॉ.महेंंद्र भवरे म्हणाले की, मी लेखक म्हणून भित्तीपत्रकेमुळेच पुढे आलो आहे, सुरुवातीच्या काळात मी कविता लेखन भित्तीपत्रिकेच्या माध्यमातूनच केले आहे. म्हणून मला कवी म्हणून नाव लौकिक मिळाला. अध्यक्षीय समारोप करतांना प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.म.सु.पगारे यांनी संत तुकारामांच्या सेक्युलर व वौज्ञानिक जाणिवांविषयीची माहिती दिली. तसेच प्रशाळेतील उपक्रमांची माहिती देवून प्रशाळा विद्याथ्र्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तत्पर असते असे सांगितले. यावेळी डॉ.आशुतोष पाटील, प्रशाळेतील इतर शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनी, उजळणी वर्गातील शिक्षक उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा.दिपक खरात यांनी केले.

0