उत्तर महाराष्ट्र जळगांव शिक्षण

राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेकरिता संघ व्यवस्थापक म्हणून कमलेश नगरकर यांची निवड

जळगाव:- भारतीय शालेय खेळ महासंघाने दिल्ली यांच्यावतीने ६५ व्या राष्ट्रीय शालेय जलतरण व डायव्हिंग स्पर्धा दिनांक १७ ते २२ नोव्हेंबर २०१९ दरम्यान होणाऱ्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी स्विमिंग पूल कॉम्प्लेस दिल्ली येथे होणार आहेत.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी नागपूर येथे राज्यस्तरीय १४,१७,१९ वर्षाआतील शालेय राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा आयोजित केली होती.
यातून महाराष्ट्र राज्याची निवड करण्यात आली होती या संघासोबत संघ व्यवस्थापक म्हणून जळगाव पोलीस जलतरण तलावाचे प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कमलेश नगरकर यांची निवड करण्यात आलेली आहे त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री डॉ.पंजाबराव उगले अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके, पोलीस निरीक्षक सुभाष कावरे,राज्याचे सहाय्यक क्रीडा संचालक श्री जयप्रकाश दुबळे,जिल्हा क्रीडा अधिकारी श्री मिलिंद दीक्षित व जिल्हा जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र ओक सचिव फारुक शेख यांनी अभिनंदन केले.

0