राजकीय

दहीहंडी बक्षिसाची रक्कम केरळ पुरग्रस्तांना

एरंडोल/ प्रतिनिधी

येथील सालाबादाप्रमाणे मरीमाता चौक येथे दहींडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु यावर्षी दहीहंडी कार्यक्रमाची शहरातील सर्वोच्च बक्षिसाची रक्कम ही केरळ येथील पुरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे व उपनगराध्यक्षा छाया दाभाडे व परिवाराकडून हे बक्षिस दिले जाते.
विविध स्तरातून कौतुक-यावर्षी अकरा हजार अकाराशे अकरा रुपये बक्षिस रक्कम केरळ येथील आपदग्रस्त यांना देणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे व छाया दाभाडे यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते म्हणून नाव असलेले आनंद दाभाडे, छाया दाभाडे व त्यांच्या परिवारातर्फे वर्षभर विविध व सामाजिक तसेच शैक्षणिक कार्यक्रमाचे सतत आयोजन करुन गरजवंतांना कायम मदत केली जाते. त्यांच्या या उपक्रमाबद्दल शहरातील विविध स्तरातून कौतुक केले जात आहे. केरण येथे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेकांचे बळी गेले असून हजारो लोक बेघर झाले आहे. देशासह परदेशातूनही मदतीचा ओघ सुरु आहे.

0