उत्तर महाराष्ट्र जळगांव शिक्षण

रसायन शास्त्र विषयात प्रा. योगेश मोरे यांना पीएच.डी प्राप्त

जळगाव ;- मूळजी जेठा महाविद्यालय येथील पदवी व पदव्युत्तर केमेस्ट्री विभागाच्या प्रा. योगेश मोरे यांना रसायनशास्त्र विषयात नुकतीच ‘विद्यावाचस्पती’ पदवी प्राप्त झाली .

पर्यावरणात प्रदूषण निर्माण करणारे घटक नॅनो पार्टिकल मुळे कसे कमी करता येवू शकतात, हे त्यांनी आपल्या संशोधना द्वारे सिद्ध केले.

डॉ.हेमंत नारखेडे,पी.के.कोटेचा महिला महाविद्यालय, भुसावळ हे त्यांचे संशोधन मार्गदर्शक होते. त्यांची मौखिक मुलाखत घेण्यासाठी आणंद येथून डॉ.एन.जी.परमार हे बहिस्थ परीक्षक म्हणून उपस्थित होते. तर क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील, मु.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, डॉ.एस.एन.भारंबे, डॉ.देवयानी बेंडाळे, डॉ.आर.एम.राठोड आणि मु.जे.परिवारातील सहकाऱ्यांनी डॉ.योगेश मोरे यांचे अभिनंदन केले.

0