आंतरराष्ट्रीय जळगांव सामाजिक

डॉ. यशोवर्धन काबरा ह्यांचे इटली येथील जागतिक परिषदेत प्रबंध सादर

इटली ;– इंटरनॅशनल होमियोपॅथिक मेडिकल सोसायटी (लीगा मेडिकोरम होमिओपथीका इंटरनॅशनलिस) या होमियोपॅथिक डॉक्टरांच्या सर्वात मोठ्या कॉन्फरन्सचे इटली येथे आयोजन करण्यात आले होते. डॉ. काबरा यांनी “होमियोपॅथिक औषधांची पांढरे डागांमध्ये असलेली परिणामकारकता” यावर संशोधन केले आहे. त्यासाठी डॉ. यशोवर्धन काबरा यांना सोरेनटो, इटली येथे आमंत्रित करण्यात आले होते. होमिओपॅथी उपचार पद्धतीने पांढरे डाग पूर्णपणे बरे होऊ शकतात यावर डॉ. यशोवर्धन यांनी मार्गदर्शन केले. परिषदेमध्ये सादरीकरण केलेले ते सगळ्यात युवा संशोधक होते. जगभरातून पंधराशेच्यावर डॉक्टर या कॉन्फरन्समध्ये सहभागी झालेत. डॉ. यशोवर्धन यांनी पदव्युत्तर शिक्षण सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल मुंबई येथून पूर्ण केले असून होमिओपॅथीचे शिक्षण इंग्लंड येथून घेतले आहे.

जास्तीत जास्त दुःखीतांना पांढरे डाग मुक्त करण्याचा निर्धार ह्या प्रसंगी व्यक्त केला. तसेच किशोरवयीन मुली आणि गरजू रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला.

0