उत्तर महाराष्ट्र जळगांव राजकीय

पिंप्राळा उड्डाण पुलासंदर्भात स्थायी सभेत नवनाथ दारकुंडे यांनी केला प्रश्न उपस्थित

जळगाव ;- शिवाजी नगर उड्डाण पुलाला मंजुरी देण्यात आली असून पिंप्राळा भागातील रहिवाशांना उड्डाण पूलाचाही पर्याय निवडून शिवाजी नगरचा १८ मीटर रस्ता मनपाने ताब्यात घ्यावा अशी मागणी स्थायी समितीच्या आज मनपात झालेल्या सभेत सदस्य नवनाथ दारकुंडे यांनी केली.
सभापती शुचिता हाडा यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा घेण्यात आली . यावेळी सदस्य दिलीप पोकळे , नवनाथ दारकुंडे, नितीन बरडे , विष्णू भंगाळे, सदाशिव ढेकळे, चेतन सनकत , आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगरसेवक नवनाथ दारकुंडे म्हणाले कि, सध्या प्रशासनाने शिवाजी नगर उड्डाणपूल बनविण्यास मंजुरी दिली असून त्याचे कामही सुरु झाले आहे . मात्र नागरिकांना वळसा घालून फेऱ्याने जावे लागत असून त्यांचेही हाल होत आहे . प्रशासनानेलोखंडी जिना उपलब्ध करून द्यावा अशी मागणी दारकुंडे यांनी स्थायीच्या सभेत केली . तसेच पिंप्राळा परिसरातील रहिवाशांना शिवाजी नगर उड्डाण पुलासारखा पर्याय उपलब्ध करून द्यावा तसेच बजरंग बोगद्यासारखा दुसरा बोगदा निर्माण न करता पर्यायी व्यवस्था प्रशासनाने करावी . कारण पावसाळ्यात बजरंग बोगद्यात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होतात . तसेच शिवाजी नगरकडून जाणारा १८ मीटर रस्ता मोजमाप करून रेल्वे हद्दीतून ताब्यात घेण्याची कार्यवाही करावी अशी मागणीही नवनाथ दारकुंडे यांनी स्थायीच्या सभेत केली .

0