आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय

भारतात विमानाचा प्रवास रिक्षापेक्षा स्वस्त – जयंत सिन्हा

नवी दिल्ली – देशात उडलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दराच्या भडक्यामुळे केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांवर टीका होत असतानाच केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री जयंत सिन्हा यांनी एक वेगळाच तर्क लावला आहे. आजच्या घडीला विमानाचा प्रवास ऑटो रिक्षाच्या प्रवासापेक्षा कमी पैशात होतो, असे त्यांनी म्हटले आहे.

रिक्षाने देशात प्रवास करतांना प्रति किमी ५ रुपये खर्च करावे लागतात. पण विमान प्रवासाला मात्र प्रति किमी मागे ४ रुपये खर्च करावे लागतात. सिन्हा इंदोर मॅनेजमेंट असोसिएशनच्या (आयएमए) २७ व्या आंतरराष्ट्रीय मॅनेजमेंट अधिवेशनामध्ये बोलत होते. ते त्यावेळी म्हणाले ऑटो रिक्षा प्रवासापेक्षा इंदूर ते दिल्ली विमान प्रवास स्वस्त होतो. आज विमान प्रवास आपल्याला फक्त ४ रु. प्रति किमीमध्ये करता येतो.

पेट्रोल व डिझेलच्या किंमतीने संपूर्ण देशभरात उच्चांक गाठला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आजही वाढ दिसून येते. राजधानीत पेट्रोलचा आजचा दर ८६.७२ रुपये प्रति लिटर झाला आहे. आजच्या दरातील वाढीची गेल्या चार दिवसातील दरांशी तुलना केल्यास मुंबईतील पेट्रोल दरात १ रुपये ६२ पैसे इतकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

0