आंतरराष्ट्रीय उत्तर महाराष्ट्र जळगांव सामाजिक

जळगावात १८ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

३,४,व ५ जानेवारी दरम्यान होणार महोत्सव

जळगाव ;– स्व. वसंतराव चांदोरकर प्रतिष्ठानतर्फेजळगावात ३,४ आणि ५ जानेवारीला दोन सत्रांमध्ये छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत आयोजन करण्यात आल्याची माहिती दीपक चांदोरकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली .
यामहोत्सवाचे उदघाटन ३ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता होणार असून या उदघाटन समारंभाला अशोक जैन, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे , महापौर सीमा भोळे, भारत अमळकर , आ. राजूमामा भोळे, अशोक सोनोने, अनिल राव, महाबळेशवर्कर राजेश गाडगीळ , जाई काजळ , आदी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. उदघाटन प्रसंगी आणि तीन दिवस डॉ. अपर्णा भट आणि कलाकार गुरुवंदना सदरं करून प्रतिष्ठानचे कालावन्त नांदी सादर करणार आहेत . पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात सारेगमफेम विश्वजित बोरवणकर आपली कला सादर करणार आहेत. तर दुसऱ्या सत्रात युवा कलाकार आणि सरगम लिटिल चॅम्प्स मुग्धा वैंश्यपायन सादर करणार आहेत. दुसर्या दिवशीच्या प्रथम सत्रात प्रख्यात नर्तक पंडित गोपीकृष्ण यांचे नातू विशालकृष्ण आपला नृत्याविष्कार सादर करतील . द्वितीय सत्रात तबलावादक पंडित किशन महाराज यांचे नातू पंडित शुभ महाराज व प्रख्यात पखवाज वादक पंडित प्रतापराव पाटील यांची तबला व पखवाज यांची जुगलबंदी सादर होणार आहे. याजुगलबंदीला वादक संदीप मिश्रा हे सारंगीची साथ करणार आहेत . तिसर्यादिवशी प्रथम सत्रात जगद्विख्यात शास्त्रीय संगीत गायिका पंडिता देवकी पंडित ह्या आपली कला सादर करतील तर द्वितीय आंतरराष्ट्रीय कलावंत उस्ताद शाहिद परवेझ खान यांच्या सतार वादनाने अठराव्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचा समारोप होणार आहे. अशी माहिती दीपक चांदोरकर यांनी दिली .
—————————–

0