उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

पिंपळकोठा गोळीबार प्रकरणी एका आरोपीच्या धुळ्यातून मुसक्या आवळल्या

पारोळा;- तालुक्यातील पिंपळकोठा येथे यात्रेदरम्यान पूर्व वैमनस्यातून एकावर गावठी कट्ट्याने गोळीबार केल्याची घटना घडली होती . याप्रकरणातील एका आरोपीला पारोळा पोलिसांनी पकडले आहे . बाळा उर्फ तुषार प्रदिप कदम- वय १९ रा नवलनगर असे आरोपीचे नाव आहे .
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , आरोपी जगदीश पाटील , तुषार प्रदीप कदम व इतर साथीदारांनी भांडण सोडवण्यास गेलेले चेनेश्वर पाटील यांच्या पोटात गावठी कट्ट्याने गोळी मारून पसार झाले होते . यातील बाळा उर्फ तुषार यास पकडण्यासाठी सर्व पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले.या बाबत २६ नोव्हेम्बरला रात्री साडेदहा वा.बाळा उर्फ तुषार प्रदिप कदम- वय १९ रा नवलनगर याच्या विरुध्द पारोळा पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला होता . तेव्हा पासुन या गुन्हयातील आरोपी बाळा उर्फ तुषार कदम हा फरार होता
तेव्हा आरोपी हा २ डिसेंबर रोजी धुळे शहरात फिरत आहे असल्याची गुप्त माहीती मिळाल्याने पो.अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले , अप्पर पो.अधिक्षक सचिन गोरे ,उपविभागीय पो.अधिकारी अमळनेर पो.नि. लिलाधर कानडे पारोळा.पो.स्टे
यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा पो.स्टेचे पोहेकॉ रविंद्र रावते, , पो.काँ सुनिल साळुखे, पो.कॉ.पंकज राठोड ,किशोर भोई , दिपक अहीरे,
यांच्या पथकाने सापळा रचूनआरोपीला ताब्यात घेतले असुन त्याला पुढील कारवाईसाठी ताब्यात देण्यात आले आहे . तपास पो.निरीक्षीक लिलाधर कानडे करीत आहे.
———————————-

0