मुंबई राजकीय

पंकजा मुंडेसह अनेक नेते शिवसेनेच्या वाटेवर- खा. संजय राऊत

मुंबई;- गेल्या महिनाभपासून सुरू असलेला सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटला आहे. मात्र यामध्ये भाजपला मोठा धक्का बसला. राज्यात बहुमत असूनही भाजपला सत्ता स्थापन करता आलेली नाही. यानंतर भापला अजून एक मोठा धक्का बसणार आहे. पंकजा मुंडेंच काय राज्यातील अनेक बडे नेते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे. पंकजा मुंडेंचा 12 तारखेलाच कळेलही असेही ते म्हणाले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आले आहे.

पंकजा मुंडे लवकरच राजकीय भूकंप करणा अशा चर्चा सुरू असताना संजय राऊतांनी हे विधान केल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसणार अशाचर्चा सुरू आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये पंकजा मुंडेचा धक्कादायक पराभव झाला. त्यांच्या हक्काच्या परळी मतदारसंघामधून त्यांचा भाऊ धनंजय मुंडेंकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. राज्यातील सत्ता भाजपने गमावली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आता स्थापन झाले आहे. या सर्व घडामोडीनंतर पंकजा मुंडे यांनी राज्यात राजकीय भूकंप घडवण्याची तयारी सुरु केली असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे. रविवारी पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांसाठी फेसबूकवर पोस्ट लिहिली आहे. त्या आता आपल्या कारकिर्दीविषयी मोठा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत.

पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे. 12 डिसेंबर,लोकनेते मुंडे साहेबांचा हा जन्मदिवस…त्या दिवशी बोलेन तुमच्याशी मनसोक्त…जसं तुम्हाला माझ्याशी बोलावं वाटतं, बघावं वाटतं.. तसं मलाही तुम्हाला बोलावं वाटतं. मी महाराष्ट्राच्या लोकांच्या विषयी बोलतेय …तुमच्याशी संवाद ही उत्सुकता माझ्या मनात आहे..नाहीतरी कोणाशी बोलणार आहे मी? तुमच्याशिवाय माझं कोण आहे? अशा आशयाची पोस्ट पंकजा मुंडेंनी केली आहे. यानंतर संजय राऊतांनी हा दावा केल्यानंतर भाजपला मोठा धक्का बसणार असे चित्र निर्माण झाले आहे.

0