उत्तर महाराष्ट्र जळगांव

निसर्ग कवींना भावले ‘निसर्ग’ चित्रे सचिन राऊत यांच्या चित्रप्रदर्शनाचा समारोप

जळगाव ;- अनुभूती निवासी शाळेतील शिक्षक आणि चित्रकार सचिन राऊत यांच्या ‘निसर्ग’ या संकल्पनेवर आधारीत चित्राचे प्रदर्शन पु. ना. गाडगीळ येथील कलादालनात आयोजित करण्यात आले होते. याप्रदर्शनाचा समारोप शनिवारी कविवर्य ना. धों. महानोर यांच्या उपस्थितीत पार पडला.

याप्रसंगी ना. धों. महानोर यांनी सचिन राऊत यांच्या ‘निसर्ग’ चित्राचे वैशिष्ट्ये समजून घेत त्यांतील भाव याचे कौतुक करीत चांगल्या निर्मितीबद्दल शुभेच्छा दिल्यात. या चित्रात निसर्गाच्या विविध छटा राऊत यांनी चितारलेल्या असुन सर्व ऋतुमधील चित्रण रंगाचा उत्तम वापर करत अनोख्या कलाकृती निर्मिती केली आहे. प्रदर्शनाला जळगावसह आसपासच्या शहरातुन अनेक चित्रकार व रसिक मंडळींनी भेट दिली आहे. यासमारोप प्रसंगी सुलोचना महानोर, शशिकांत महानोर, संदिप पोतदार, संतोष पांडे, डॉ. कल्याणी गुंठे, चित्रकार सचिन मुसळे, हर्षल पाटील, सुनील दाभाळे आदी उपस्थित होते.

0