जळगांव राजकीय

जळगावातील रहदारीचे रस्ते मोकळे करण्याच्या मागणीसाठी सेनेचे अनोखे आंदोलन

जळगाव;- जळगाव शहरातील मुख्य रस्त्यांवरुन मोठ्या प्रमाणात नागरिकांचा वावर सुरु असतो पण त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात असलेल्या अतिक्रमणा मुळे अनेक अडचणींना समोरे जावे लागते काही वेळा शिविगाळ ,मारामारी या सारख्या घटना ही मोठ्या प्रमाणात घडतात.
त्याची दखल घेत शिवसेना जळगाव महानगर तर्फे मनपा च्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ फळे विकुन मनपा प्रशासनाचे लक्ष वेधले.
जळगाव शहारातिल मुख्य रस्त्यांवरिल अतिक्रमण हा नेहमीच वादाचा मुद्दा राहिला आहे. अनेक वेळा मनपा प्रशासनाला तोंडी व लेखी निवेदन देऊनही दखल न घेतल्याने शिवसेना महानगर च्या वतीने मनपा प्रवेशद्वाराच्या समोर फळ विक्री करुन प्रशासनाचे लक्ष वेधले. शिवसेना नेहमी सामान्य जनतेच्या न्याय हक्का साठी रत्यावर उतरली आहे. शिवसेनेची बांधिलकी ही नेहमी जनतेशी राहिली आहे.
आजच्या आंदोलनाने कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतु नसुन रत्यावर येऊन आपला उदरनिर्वाहा साठी व्यवसाय करणार्या गोर गरिब नागरिकांचे पुनर्वसन करावे व मुख्य रस्ते मोकळे व्हावेत हाच त्या मागचा ऊद्देश आहे  शिवसेनेच्या मागण्यांचे निवेदन उपायुक्त यांना देण्यात आले. या वेळी शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे मनपा विरोधी पक्षनेते, सुनिल महाजन गटनेते बंटी जोशी, नगरसेवक नितीन बर्डे ,प्रशांत नाईक ,अमर जैन, गणेश सोनवणे ,सादिक खाटिक, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील ,उपमहानगर प्रमुख मानसिंग सोनवणे, अल्पसंख्यांक आघाडी शहर प्रमुख जाकिर पठाण, महिला आघाडी महानगरप्रमुख शोभा चौधरी, मंगला बारी, शहर प्रमुख ज्योती शिवदे, मनिषा पाटील, सरिता माळी, निलू इंगळे, निर्मला चौधरी ,शरिफा मिस्त्री, खुबचंद साहित्या, प्रशांत सुरळ्कर, हेमंत महाजन, पूनम राजपूत ,ओगल पान्चाळ ,शंतनु नारखेड़े, डॉ व्ही आर तायडे, चिंतामण जैतकर, अंकुश कोळी ,संजय सांगळे, शोएब खाटिक, भावेश ठाकुर ,आबिद शेख ,देवीदास पवार ,ईश्वर राजपूत ,अश्रफ शेख ,रोहन सपकाळे, प्रकाश पाटील ,रईस शेख ,भैया वाघ ,गणेश गायकवाड ,प्रकाश बेदमुथा ,परेश वाणी, दिपक कुकरेजा आदींसह शिवसैनिक मोठ्या संखेने उपस्थीत होते

0