उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

झोपेची गोळी देऊन नराधम बापाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

 

बाप बेटीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी बुलढाणा जिल्ह्यातील घटना

बुलडाणा (प्रतिनिधी );- आपली लाडकी लेक ज्याला माय बाप लहान चा मोठा करतात,तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपतात, तिला शिकवतात, तिचे थाटात लग्न लावून देतात ,वडील आणि मुलगीच हे नातंच वेगळ असते . मुलगी ही आपल्या जन्मदात्या बापाला कधीच विसरत नाही हे नातंच जगा वेगळ असते . परंतु आज बाप बेटीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे,. राक्षस, हैवान झालेल्या एका नराधम बापाने आपल्या पोटच्या मुलीला झोपेच्या गोळया देऊन तिच्या शरीराचे लचके तोडले आहे. बाप बेटीच्या पवित्र नात्याला कलंकित करणारी घटना मंगळवारी उघडकीस आली असून पोलिसांनी नराधम बापास अटक केली आहे.


या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार अंढेरा पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या बिट क्र 3 मधील एका गावामध्ये एका इसमाला एक १३ वर्षांची मुलगी असून ती मुलगी सहा वर्षांची असतांना त्याची पत्नी मयत झाली आणि वडील व मुलगी आजी जवळ राहत असे परंतू यांना किती दिवस सांभाळयाचे म्हणून आजीने मुलाचा दुसरा विवाह करुन दिला. मात्र तो स्त्री लंपट असल्याने त्याचे दुसऱ्या पत्नी सोबत पाहिजे तसे जमत नसल्याने दुसरी पत्नी त्याला सोडून माहेरी गेली आहे व तेथेच राहू लागली आहे, त्यामुळे १३ वर्षांची ती मुलगी वडीलाबरोबर ,आजी जवळ राहून गावातील शाळेत ८ वी मध्ये शिक्षण घेत होती. २ डिसेंबर रोजी १३ वर्षांची अल्पवयीन मुलगी चिखली शहरात रडत रडत एका रस्त्यावरून जात होती. तेव्हा येथील रयत क्रांती संघटनेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील,स्वाभिमानीचे नितीन राजपूत,जपे वकील,उद्धव थुट्टे पाटील,छोटू कांबळे व अन्य काही पत्रकारांना ही मुलगी रडत असल्याचे दिसून आले अल्पवयीन मुलगी रडत असल्याचे पाहून त्यांना शंका आली. त्यांनी या मुलीस थेट पोलीस स्टेशन ला नेले. पोलिसांनी तिला ताब्यात घेवून विचारपूस करीत तिला शहरात राहत असलेल्या तिच्या आत्याच्या घरी पोचवायला गेले असता तिने तिचा स्वीकार करण्यास नकार दिला. तिच्या आत्याने पोलीस स्टेशनला येवून सांगू लागली की ही मुलगी वेडसर आहे. मात्र मुलीने खरी हकीकत पोलिसांना सांगितली की माझे वडील गेल्या दोन,तीन महिन्यांपासून जबरदस्तीने वारंवार बलात्कार करीत आहेत . त्रास होत असल्याने आत्याला वडिलांची हकीकत सांगण्यासाठी गेली असता उलट आत्याने मला मारहाण केली असे सांगितले. त्यामुळे चिखली पोलिसांनी मुलीला रात्रभर पोलीस स्टेशनला ठेवून मंगळवार दि. ३ डिसेंबर रोजी अंढेरा पोलिसांच्या स्वाधीन केले. अंढेरा पोलिसांनी मुलीच्या नातेवाईक व गुप्त चौकशी केली असता ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी आरोपी वडील यांच्यावर कलम ३७६,पोस्को बाल लैंगिक अत्याचार अपराध कलम नुसार गुन्हा दाखल करुण नराधम बापास अटक केली आहे. दरम्यान घडलेल्या घटने मुळे परिसरात खळबळ उडाली असून लोकांमध्ये संताप व चीड व्यक्त केल्या जात आहे,कठोर कारवाई करण्यासाठी आंढेरा पोलीस स्टेशन येथे यावेळी प्रशांत ढोरे पाटील,सुभाष राजपूत,उद्धव थुट्टे पाटील,नितीन राजपूत,योगेश शर्मा,अनिल वाकोडे,मनोज जाधव,स्वप्नील तेजनकर दिवसभर ठाण मारून बसलेले होते.

आरोपी ला कडक शिक्षा देण्यात यावी – प्रशांत ढोरे पाटील ,

आज घडलेली ही घटना फारच दुःखदायक दुर्देवी घटना आहे एक जन्म दाता बापच असे सैतांनी कृत्य करेल या वर विश्वास बसत नाही. अशा आरोपींना वेळीच ठेचले गेल्या पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे रयत क्रांती संघटनेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील यांनी म्हटले आहे , हैद्राबाद येथील घटना ताजी असतांनाच अशी घटना घडल्यामुळे आरोपींना फाशी ची शिक्षा झाली पाहिजे तेव्हाच अशा घटना घडणार नाही असे ही ते म्हणाले.

0