आंतरराष्ट्रीय

ढेकू खुर्द येथे आ. शिरीष चौधरी यांनी स्वखर्चातून उभारले शिवरायांचे भव्य स्मारक

आमदारांच्या हस्ते थाटात लोकार्पण, गावातील तरुणांची झाली स्वप्नपूर्ती

अमळनेर – तालुक्यातील ढेकू खु. येथे आ. शिरीष चौधरी यांनी तरुणांच्या इच्छापूर्तीसाठी स्वखर्चातून गावात भव्य असे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारल्याने या स्मारकाचे आ चौधरींच्या हस्ते थाटात लोकार्पण करण्यात आले.यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त करताना हे शिव स्मारक केवळ गावाच्या शोभे पुरता ना राहता तरुणांनी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल करावी तरच या स्मारकाला अर्थ राहील अशी भावना व्यक्त केली.
ढेकू बु गावातील तरुणांनी व ग्रामस्थांनी आ. चौधरीची भेट घेऊन गावात भव्य असे शिवस्मारक व्हावे अशी मागणी केली होती,यावर आ चौधरीनी लागलीच होकार देत कोणत्याही शासकीय निधीची वाट न पाहता स्वखर्चातून भव्य असे स्मारक बनविले.हे स्मारक अत्यंत आकर्षक असून इतिहासाला उजाळा देणारे आहे,विशेष म्हणजे या स्मारकाचे काम मुस्लिम समाजाचे ठेकेदार फारुख बेलदार आणि तारीख पठाण यांनी साकारल्याने आ चौधरींच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच या स्मारकाचे जंगी सोहळ्यात आमदारांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले.यावेळी आपल्या मनोगतात त्यांनी सर्वांना सोबत घेऊनच गावाचा विकास करण्याबाबत विचार मांडून ढेकू राजवड पळासदडे रस्ता डाबरीकरणासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 87 लाख मंजूर करण्यात आलेले असल्याचे सांगीतले व लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी ग्वाही दिली.तसेच तरुण वर्गाच्या आणखी एक मागणीनुसार लवकरच अत्याधुनिक व्यायांमशाळेचे निर्माण करण्याचे आश्वासन आमदारांनी दिले.
यावेळी पाडळसे धरणाला केंद्रीय जलआयोगाची मान्यता मिळवुन दिल्याबद्दल उपस्थित सरपंच, महिला भगिनी, छत्रपती शिव प्रतिष्ठान स्मारक समिती, व ग्रामस्थांकडून आमदारांचा भव्य सत्कार करण्यात आला.तसेच कार्यक्रम झाल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ आ चौधरीच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले.
याप्रसंगी निवृत्त डी वाय एस पी अरविंद अमृतराव पाटील, सरपंच रामकृष्ण पाटील, माजी प.स सदस्य संदेश पाटील, संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष पाटील, भिकन पाटील, मा. सरपंच सावखेडे राजेंद्र पाटील, आर्डी उपसरपंच किशोर पाटील, बाळासाहेब सदांनशिव, सुनील भामरे, सुभाष पाटील,पी.एस.आय मोहन पाटील, भिकन पाटील, रणछोड पाटील, रोहित पाटील, सूरज पाटील, बंटी पाटील, प्रदीप सोनवणे, लोटन पाटील, सोमनाथ पाटील, मयूर पाटील, रोहन पवार, भागवत पाटील, जितेंद्र ठाकरे, भिकेश पाटील, मनोज पाटील, मयूर चव्हाण, समाधान मराठे, मुकेश मोरे, रोहित पाटील, दीपक मालचे, शेखर मालचे, भूषण पाटील, मोतीलाल मोरे, करन मोरे, मयूर बाविस्कर, मयूर पाटील, नरेश चव्हाण, राहुल पाटील, सागर मालचे, वाल्मिक पाटील, हर्षल पाटील, पराग पाटील, जितेंद्र पाटील, सागर साळुंखे, दिग्विजय पाटील, पवन पाटील, देवेंद्र पवार, चेतन पाटील, निलेश पाटील, जयेश साळुंखे, शुभम पाटील, धनंजय पाटील, आनंद पाटील, विश्वास पाटील,सौरभ बाविस्कर, जयेश पाटील,उदय पाटील, देवेश पाटील, चेतन पाटील,भुषण पाटील,विवेक पाटील,जयदेव पाटील, व ग्रामस्थ व महिला यावेळी उपस्थित होते.

0