क्रिडा

सातारा हिल हाप मॅरेथॉन 21 किलोमीटर अंतर स्पर्धेत जळगाव रनर्स ग्रुप

जळगांव – सातारा येथे पार पडलेल्या पंजाब नॅशनल बॅंक आयोजीत सातारा हिल हाप मॅरेथॉन 21 किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत जळगाव रनर्स ग्रुपच्या शिवाजी नलभे 1 तास 54 मिनिटे ,डाॅ.राहूल महाजन 2 तास 01 मिनिटे,सुनील नन्नवरे 2 तास 09 मिनिटे या तिघांनी या वेळेत ही स्पर्धा पुर्ण केली.तसेच जळगाव रनर्स ग्रुपचे आशिष पाटील,स्वप्निल मराठे,ज्ञानेश्वर पाटील,अभय पाटील,प्रा.शशांक झोपे जिवन वनारसे,मंगेश चौधरी डाॅ.सोनाली महाजन,डाॅ.भुषण झंवर,मनोजकुमार सिंग,निलेश पाटील,नितिन चौधरी,डाॅ.प्रशांत देशमुख,राजेश महाजन,राजेश चोरडिया, राकेश गव्हांडे,सचिन महाजन, उमेश महाजन,विवेक बागरी,अजित महाजन,ज्ञानेश्वर बढे,नितिन नारखेडे, C.A.रविंद्र खैरनार,शालिग्राम मराठे,प्रकाश सिंग,मयुर कासार,डाॅ.मिलिंद जोशी,गितेश मुदडा,सचिन मंडोरा,प्रकाश शर्मा,शाम कपुर,डॅा.सुनिल तायडे,रमेश खडसे,संतोष सिंग,प्रेमलता सिंग,प्रज्वल चोरडीया.संतोष रायचंदे.या 40 सदस्यांनी सहभाग नोंदवला.अतीशय आव्हानात्मक व खडतर या स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतातील विविध राज्यातुन तसेच केनीया, ईथीओपीया व ईतर देशातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.सातारा शहर हे पुर्ण सह्याद्री पर्वतारांगानी वेढलेले आहे स्पर्धेचा मार्ग हा चढऊताराचा व आव्हानात्मक होता.रांगडा अशा सह्याद्रीच्या पर्वताच्या रांगाचा निसर्गरम्य परिसर, जोरदार पाऊस व मधेच ढगाचां होणारा आल्हाददायक स्पर्श हा मनाला चिरतरूण करणारा अनुभव होता.स्पर्धेचे नियोजन उत्कृष्ट होते.स्पर्धेत घवघवीत यश मिळाल्याबद्दल जळगाव रनर्स ग्रुप असोसिएशनचे किरण बच्छाव,विक्रांत सराफ,निलेश भाडांरकर,अविनाश काबरा,डाॅ.विवेक पाटील यांनी कौतुक केले.

1+