राजकीय

आ.राम कदमांची ट्विटरवरून मुजोर माफी

मुंबई : घाटकोपरच्या आपल्या दहीहंडी कार्यक्रमात मुलींबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजप आ राम कदम यांच्या हे प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहून ट्विटर वर माफी मागितली मात्र त्याचा टोन मुजोर असल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मुलांनो बिनधास्त प्रेम करा,काही अडचण असली तर मला फोन करा,जी मुलगी तुम्हाला पसंद आहे ,तिला उचलून तुमच्या स्वाधीन करतो ‘ असे बेताल वक्तव्य कदम यांनी केल्यावर राज्यभरात संतापाची लाट उसळली, महिला आयोगाने सुद्धा त्यांना नोटीस पाठवून खुलासा मागितला आहे, दोन दिवस झाल्यावर राम कदम यांनी आपल्या वक्तव्याचा मीडियाने विपर्यास केल्याचे तुणतुणे वाजवत ,आपले काही चुकले हे मान्य केले नाही, आज त्यांनी ट्विटर वर माफी मागताना सुद्धा गिरे भी तो टांग उपर या म्हणीचा प्रत्यय दिला,कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास माफी मागत असल्याची सारवासारव कदम यांनी केल्याचे दिसते.

0