नोकरी

गुलाबराव देवकर फाऊंडेशनतर्फे भव्य नोकरी महोत्सव 

जळगांव / प्रतिनिधी
जळगाव ग्रामिण विधानसभा मतदार संघातील जळगाव व धरणगांव तालुक्यातील बेरोजगार तरुणांसाठी आज व उद्या असे 2 दिवसीय भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्याचा बेरोजगार तरुणांनी लाभ घ्यावा असे आवाहन माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केले आहे. 
गुलाबराव देवकर फाऊंडेशनच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना देवकर यांनी सांगितले की, नोटाबंदीनंतर सर्वत्र बेरोजगारी वाढली असून सरकार नोकरी देण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याच्या उद्येशाने नोकरी महोत्सवाचे आयोजन केले आहे.  शनिवार दि. 8 रोजी जळगांव तालुक्यातील तरुणांसाठी जळगांवातील गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयात तर रविवार दि. 9 सप्टेंबर रोजी धरणगांव येथील इंदिरा गांधी विद्यालयात तरुणांच्या मुलाखतीचे सकाळी 10 वाजेपासून आयोजन करण्यात आले आहे. या नोकरी महोत्वात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नगर येथील कार्पोरेट कंपन्यांचा सहभाग राहणार असून या कंपन्या मॅन्युफेक्चरींग फार्मसी, फायनान्स रिटेल, इंशुरंन्स, बँकिंग, टेलीकॉम, आय.टी., इ. क्षेत्रातील नामवंत कंपनीचे अधिकारी मुलाखती घेणार आहेत. यासाठी दि. 27  ऑगस्ट ते 7 सप्टें. पर्यंत दोन्ही तालुक्यातील 4180 तरुणांनी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी केलेली आहे. या महोत्सवात 5 वी पास-नापास पासून तर पदवीत्तर डिग्री, डिप्लोमा धारकांचे शैक्षणिक पात्रतेनुसार मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.
मुलाखतीसाठी येणार्‍या तरुणांनी 5 प्रती बायोडाटा, पासपोर्ट फोटो व मुळ कागदपत्रके सोबत आणावी आणि ज्या तरुणांनी नोंदणी झालेली नसेल ते देखील उपस्थित राहून लाभ घेऊ शकतात असेही श्री. देवकर यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. या पत्रकार परिषदेस वाल्मिक पाटील, लिलाधर तायडे, मंगलाताई पाटील, रमेश पाटील, धरणगांव राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष   धनराज माळी, भिमराव मराठे यांची उपस्थिती होती.
0