जळगांव राजकीय

राष्ट्रवादीच्या डॉक्टर्स सेल जळगाव तालुकाध्यक्षपदी डॉ. सुधाकर पाटील

जळगांव – राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या डॉक्टर्स सेल जळगाव तालूकाध्यक्षपदी म्हसावद येथिल डॉ सुधाकर माधवराव पाटील यांची आज नियुक्ती करण्यात आली .
मा.पालकमंत्री आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर व डॉक्टर्स सेल जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन पाटील यांच्या हंस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले . यावेळी जिल्हा बॅकेचे माजी संचालक वाल्मिक पाटील , महिला प्रदेश सरचिटणीस सौ. मंगलाताई पाटील , जळगाव ग्रामिण विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश माणिक पाटील , माजी जि.प. सदस्य रविंद्र पाटील , धरणगाव तालूकाध्यक्ष धनराज माळी सर , युवक तालूकाध्यक्ष नाटेश्वर पवार , विद्यार्थी सेल अध्यक्ष विजय पाटील , जळगाव तालूका ओबीसी सेल अध्यक्ष मधुकर पाटील , नांद्राचे सरपंच शांताराम पाटील , आमोदयाचे माजी सरपंच नवल पाटील ,म्हसावद चे कैलास पाटील , आतिक पटेल , प्रविण तुकाराम पाटील , अनिल पाटील , विक्की पाटील , विवेक चव्हाण  यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

1+