कल्याण मुंबई व्यवसाय

मुरबाड तालुक्यात उभी भात पिके करपल्याने शेतकरी हवालदिल

तात्काळ पंचनामे करून भरपाईची मागणी 
मुरबाड – मंगल  डोंगरे
मुरबाड तालुक्यात उभी भातपिके पुर्णता करपल्याने शेतकरी हवालदिल झाला असुन सदर पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी शेतकरी संतोष भांगरथ याने केली आहे.
मुरबाड हा तालुका एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखला जायचा. मात्र हे कोठार सांभाळणाऱ्या   बळीराजावर आस्मानी संकट कोसळल्याने तो पुरता हैराण झाला आहे. कधी महापुर तर कधी लपंडाव खेळणा-या पावसाने दडी मारल्याने या शेतक-याची बारा महिने अहोरात्र राबराब राबुन केलेली मेहनत फुकट जाते. अन् मग अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. यंदाही अशीच परिस्थिती निर्माण झाली असुन गौरी-गणपती सणांपासुन पावसाने दडी मारल्याने हाता तोंडांशी आलेली भात पिके उभी करपुन गेली आहेत. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतक-याला न्याय मिळावा म्हणून शासनाने  तात्काळ पचंनामे करून नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी संपुर्ण तालुक्यातील शेतकरी वर्गाकडुन होत असल्याचे शेतकरी संतोष भांगरथ यांनी सांगितले.
0