अमरावती विदर्भ सामाजिक

रावण दहन केल्यास गाढवावरून धिंड !

महानंदा टेकाम यांचा अमरावतीत इशारा

अमरावती :  शहरात विजया दशमीला होणारे पारंपरिक रावण दहन अडचणीत सापडले आहे, आदिवासी महिलांनी तीव्र आक्षेप घेऊन खरमरीत इशारा दिल्यामुळे वातावरण तंग झाले आहे.

रावण दहन केल्यास आयोजकासह त्यांच्या सहकाऱ्यांचे पुतळे बनवून गाढवावर बसवून धिंड काढून बांगड्या, साडी चोळी नेसवून दहन करण्याचा इशारा अनुसूचित जमाती संघटनेच्या अध्यक्षा महानंदा टेकाम यांनी दिला आहे.

टेकाम यांनी शहर पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात हा इशारा दिला असून आम्ही आदिवासी ज्यांना पूज्यनीय मानतो अशा महान रावण यांचा हा अपमान असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे भीम आर्मी या संघटनेने सुद्धा रावण दहन करू नका अशी विनंती आयोजकांना केली असून विनंतीला मान न दिल्यास पोलिसांनी रावण दहन करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

0