उत्तर महाराष्ट्र जळगांव व्यवसाय

भंगाळे गोल्ड’च्या वर्धापनदिनानिमित्त सोनं खरेदी करा, सोनं जिंका ऑफर

जळगाव – शहरात अल्पावधीतच आपल्या विश्‍वासार्हता आणि प्रामाणिक व्यवहारामुळे तसेच गुणवत्तापूर्ण व्हरायटी दागिन्यामुळे लोकप्रिय झालेल्या भंगाळे गोल्डतर्फे प्रथम वर्धापनदिनानिमित्त दि. 1 ते 30 नोव्हेंबर दरम्यान ग्राहकांप्रती कृतज्ञता व्यक्‍त करण्याकरिता कृतज्ञता महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाअंतर्गत ग्राहकांसाठी सोनं खरेदी करा, सोनं जिंका ही आकर्षक योजनाही जाहीर करण्यात आली आहे.
भंगाळे गोल्डचा 6 नोव्हेंबर रोजी प्रथम वर्धापनदिन आहे. आजवर ग्राहकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ग्राहकांप्रती कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी भंगाळे गोल्डतर्फे कृतज्ञता महोत्सव दि. 1 ते 30 नोव्हेंबर दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. यात ठराविक रकमेचे किमान सोनं खरेदी केल्यावर सोनं जिंका योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत खरेदी केल्यानंतर ग्राहकांना कूपन देण्यात येणार असून, हे कुपन ग्राहकांनी भरून भंगाळे गोल्ड येथे असलेल्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकावयाचे आहे. यानंतर लकी ड्रॉद्वारे विजेत्या ग्राहकांना प्रथम 20 ग्रॅम सोन्याचे दागिने, द्वितीय – 10 ग्रॅम सोन्याचे दागिने, तृतीय – 7 ग्रॅम सोन्याचे दागिने व 2 उत्तेजनार्थ प्रत्येकी 5 ग्रॅमचे दागिने अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्‍त ग्राहकांच्या फायद्याची सोने बुकिंग योजनादेखील या दरम्यान सुरु आहे. तसेच घडणावळ कमी असण्यासोबतच मोडमध्ये घट लावण्यात येणार नाही. तसेच दागिन्यांची दुरुस्ती मोफत करण्यात येणार आहे. भंगाळे गोल्डमध्ये खरेदी केलेल्या दागिन्यांवर फ्री इन्शुरन्स योजनादेखील सुरु आहे. तरी ग्राहकांनी कृतज्ञता महोत्सवादरम्यान असलेल्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन भंगाळे गोल्डचे संचालक आकाश भंगाळे व सागर भंगाळे यांनी केले आहे
1+