उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

आरटीओ कार्यालयातील इंगळे विरुद्ध सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल

मुक्ताईनगर – जळगाव येथील आरटीओ कार्यालयातील वरिष्ठ लिपीक सी.एस. इंगळे व दोन अज्ञात व्यक्तिविरुद्ध जबरी लुटीचा गुन्हा मुक्ताईनगर पोलिसात दाखल करण्यात आला आहे.

जळगांव आरटीओ कार्यालयात नियुक्तीस असलेले सी.एस.इंगळे हे कर वसुली अधिकारी असून त्यांचे कडे वरिष्ठ लिपीक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दिलीप पाटील रा. पूरनाड ता. मुक्ताईनगर हे बुधवारी रात्री 10.45 वाजेच्या सुमारास एम.एच.19 सीयू 2727 या वाहनाने जळगाव कडे येत असतांना, यादव धाब्याजवळ मागून कोठडी गावाकडून स्विफ्ट डिझायर गाडी क्र. एम. एच. 39 जे 0027 ने आले व दिलीप पाटील यांची गाडी थांबवून सी.एस. इंगळे व दोन अज्ञात इसमांनी शिवीगाळ करीत लथाबुक्क्यांनी मारहाण करीत सुमारे 32 हजार रुपयांची सोनसाखळी चोरून ते पसार झाले. या प्रकरणी दिलीप पाटील यांच्या फिर्यादीवरून सी.एस. इंगळे व दोन अज्ञात इसमाविरोधात भा. द. वि. 392, 510 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पो.नि. अशोक कडलाग हे करीत आहेत.

1+