आरोग्य उत्तर महाराष्ट्र जळगांव

गोवर रुबेला लसीकरण ; 27 नोव्हेंबरपासून आरोग्य विभागाच्या तिसऱ्या महायज्ञाला सुरुवात

पारोळा तालुक्यात 51783 मुलांना देण्यात येणार लस,प्रशासनाकडून जय्यत तयारी ; लोकप्रतिनिधिंच्या हस्ते प्रसिद्धी साहित्याचे वाटप व विमोचन
पारोळा ( प्रतिनिधी ) बालकांचे आरोग्य सुरक्षित व निरोगी राहावे यासाठी 9 महिने ते 15 वर्ष वयोगटापर्यंतच्या मुलांसाठी गोवर व रूबेला लसीकरण मोहीम शासनाकडून हाती घेण्यात आली आहे.देवी आजार ,पोलिओ निर्मूलनानंतर गोवर रुबेला ही आरोग्य विभागाची तिसरी सर्वात मोठी मोहीम आहे . याद्वारे गोवर आजाराचे निर्मूलन व रुबेला आजाराचे नियंत्रण केले जाणार आहे .27 नंबर 2018 पासून शाळा स्तरावर गोवर रूबेला लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे , यासाठी नुकतेच गोवर रुबेला लसीकरण मोहिमेच्या प्रचार प्रसिद्धी साहित्याचे जि प सदस्य डॉ श्री हर्षल माने ,श्री रोहन पाटील, श्री हिम्मत पाटील, पं स सदस्य श्री प्रमोद जाधव यांच्या शुभहस्ते विमोचन करण्यात आले, प्रसंगी गट विकास अधिकारी श्री आर के गिरासे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ तुषार मोरे, डॉ राहुल पवार आदी उपस्थित होते.
आरोग्य विभागाकडून जय्यत तयारी
शहरासह तालुक्यातील तब्बल 51783 बालकांना लस देण्यात येणार आहे यासाठी आरोग्य विभागाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे, या मोहिमेची  जनजागृती करण्यासाठी तालुक्यात गेल्या महिनाभरापासून ठीकठिकाणी विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत तालुक्यातील आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि महिला व बालकल्याण विभाग यांच्यामार्फत ही मोहीम राबवली जाईल या मोहिमेसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे तालुक्यातील सर्व शाळा अंगणवाडी मध्ये ही लस दिली जाईल याशिवाय शाळाबाह्य विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालयात दिली जाणार आहे.
*मोहिमेचे सुष्मनियोजन*
तालुक्यातील ग्रामीण भागात 40533 बालकांना व शहरी भागात 11250  अशा एकूण 51783 बालकांना  लस दिली जाणार आहे, 190 शाळा, हायस्कूल ,214 अंगणवाडीमध्ये 266 टीम च्या मदतीने  27 आरोग्य सेविकां , 42 पर्यवेक्षक, 8 वैद्यकीय अधिकारीसह मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे फिरती पथके तयार करण्यात आलेले आहेत.
*जनजागृतीव्दारे प्रचार प्रसिद्धी*
शासनाच्या विशेष मोहिमेअंतर्गत 9 महिने ते 15 वर्षापर्यंत चे एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही यासाठी तालुक्यातील आरोग्य विभागातर्फे सूष्मनियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी अंगणवाडी सेविका, आशावर्कर, शाळेतील शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. शाळा स्तरावर जनजागृतीपर विद्यार्थी व पालक सभा घेण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये वकृत्वस्पर्धा निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत विद्यार्थ्यांमार्फत प्रभातफेरी सुद्धा घेण्यात आल्या आहेत ग्रामीण भागात ग्रामसभेत जाऊन आशा,आरोग्य कर्मचाऱ्यांनी बाबत माहिती देण्यात आली आहे.
*असा राहील लसीकरणाचा कार्यक्रम*
लसीकरणाला 27  नोव्हेंबर  पासून पुढील 2 आठवडे शाळांपासून सुरुवात होणार आहे  त्यानंतर पुढील 2 आठवडे अंगणवाडी मध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे, उर्वरित राहिलेल्या बालकांना प्रा आ केंद्रात लस दिली जाईल.
 *समिती स्थापना*
लसीकरण मोहिमेसाठी प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे यात तहसीलदार, गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी नगरपालिकेचे मुख्याधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी विस्तार अधिकारी वैद्यकीय अधिकारी आदींचा समावेश आहे संपूर्ण प्रक्रिया यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
0