आरोग्य उत्तर महाराष्ट्र जळगांव

एडस् बाबत जनजागृती करुन सर्वेश्वर संस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासली – डाँ योगेश साळुंखे

पारोळा (प्रतिनिधी) धावपळीच्या युगात जो तो स्वहीत साधण्याचा प्रयत्न करतो,परंतु इतरांच्या सुख दु:खात सहभागी होऊन आपले सुख शोधुन रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा
मानुन कार्य कार्य करणारी सर्वेश्वर बहुउद्देशीय विकास संस्थेने एडस् बाबत जनजागृती करुन सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याचे प्रतिपादन कुटीर रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डाँ योगेश साळुंखे यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य एडस् नियंत्रण संस्था,मुंबई अंतर्गत (आय.सी.टी.सी.विभाग)एकात्मिक समुउपदेशन व चाचणी केंद्र कुटीर रुग्णालय,पारोळा व सर्वेश्वर बहुउद्देशीय विकास संस्था,पारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने 1 डिसेंबर हा जागतिक एडस् दिन निमित्त भव्य पोस्टर प्रदर्शन व एच. आय. व्ही.रक्त तपासणी शिबीर खांडेकर वाडा येथे संपन्न झाले. यावेळी ते अध्यक्षीय मनोगतात बोलत होते. नगरसेवक बापु तुकाराम महाजन,मनोज दिलीप जगदाळे,डाँ सुनिल पारोचे,क्षयरोग विभागाचे पर्यवेक्षक भगवान चौधरी,आय.सी.टी.सी.विभागाचे समुउपदेशक नामदेव अहीरे,किशोर पाटील,संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील उपस्थित होते.
यावेळी नामदेव अहीरे यांनी *”Know your Status”*
या घोषवाक्य बाबत माहीती देत जागतिक एडस् दिनानिमित्त राबविण्यात येणारे उपक्रमाविषयी तसेच एच.आय.व्ही.संसर्गीत प्रभावी भागात व गटात जनजागृती करुन 90-90-90 विषयी माहीती देण्यात आली.

एच.आय.व्ही.रक्त तपासणी शिबीरात 30 जणांची तपासणी
एडस् दिनानिमित्त आय.सी.टी.सी.विभाग व सर्वेश्वर बहु.संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने खांडेकर वाडा येथील महीला व युवकांनी एच.आय. व्ही. रक्त तपासणी शिबिरात सहभाग घेत 30 जणांनी शिबीरात सहभाग घेतला.
वैद्यकिय अधिकारी यांनी केले कौतुक
आय.सी टी.सी.विभाग व सर्वेश्वर संस्थेच्या समाजाभिमुख उपक्रमाचे कुटीर रुग्णालयाचे डाँ.राजेश वाल्डे,डाँ नईम बेग,डाँ प्रशांत सोनवणे,डाँ राहुल लुणावत,यांनी उपक्रमाचे
कौतुक केले.तसेच मान्यवरांच्या हस्ते पोस्टर प्रदर्शन करण्यात आले.
तालुका वैद्यकिय अधिकारी यांनी केले अभिनंदन 

एकात्मिक समुउपदेशन व चाचणी केंद्र कुटीर रुग्णालय,पारोळा व सर्वेश्वर बहु.संस्था,पारोळा यांनी एडस् दिना निमित्त विविध उपक्रम राबवुन समाजात जनजागृती केली.याबाबत तालुका वैद्यकिय अधिकारी डाँ तुषार मोरे यांनी अभिनंदन केले.आभार किशोर पाटील यांनी मानले.कार्यक्रमास जेष्ठनागरिक सह महीला व युवक मोठ्या संख्खेने उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी सर्वेश्वर बहु.संस्थेच्या सदस्यांनी व सर्वेश्वर मित्र मंडळाने परिश्रम घेतले.

0