उत्तर महाराष्ट्र क्रिडा जळगांव

राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी प्रा. प्रेमचंद चौधरी यांची पंच पदासाठी निवड

भडगाव(वार्ताहर)-कर्मवीर हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था,भडगाव, संचलीत कोळगाव ता.भडगाव येथील गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत राष्ट्रीय खो-खो पंच तथा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे तांत्रिक समिती सदस्य प्रा.प्रेमचंद शंकर चौधरी यांची भारतीय खो-खो महासंघ(KKFI) तसेच महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या(MKKA) वतीने “रुद्रपुर,उत्तराखंड येथे १५ ते १९ डिसेंबर दरम्यान पार पडणाऱ्या १४ वर्षाआतील मुला-मुलींच्या २९ व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी” पंच म्हणून निवड करण्यात आली आहे.निवडीचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व खो-खो फेडरेशन अॉफ इंडिया चे पंच म्हणून कामगिरी पाडणारे प्रा.प्रेमचंद चौधरी यांच्या ह्या निवडीने भडगाव परिसरात आनंद व्यक्त केला जात आहे.
त्यांच्या ह्या निवडीबद्दल जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष तसेच आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे तसेच महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अनुशासन समितीचे सदस्य गणपतराव पोळ यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रा.प्रेमचंद चौधरी यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र खो-खो संघटनेचे आश्रयदाते आ.अजीत पवार,अध्यक्ष खो-खो संजीवराजे नाईक निंबाळकर,भारतीय खो-खो फेडरेशनचे सहसचिव चंद्रजीत जाधव,महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव संदीप तावडे,कार्याध्यक्ष सचिन गोडबोले,खजिनदार गोविंद शर्मा,सहसचिव जयांशु पोळ,पंचप्रमुख प्रशांत पाटणकर,तांत्रिक समितीचे अध्यक्ष नागनाथ गजमल,तांत्रिक समितीचे सचिव नरेंद्र कुंदर,मार्गदर्शक राहुल पोळ आदिंनी तसेच संस्थेच्या वतीने चेअरमन प्रतापराव पाटील,मंत्रालयातील अव्वर सचिव प्रशांत पाटील,माजी नगराध्यक्ष शामकांत भोसले,माध्यमिक पतपेढीचे संचालक जगदीश पाटील,जिल्हा दुध संस्थेच्या संचालिका पुनम पाटील,प्राचार्य आर.एस.पाटील,प्राचार्य वैशाली शिंदे,मुख्याध्यापक कमलेश शिंदे,प्राचार्य आर.आर.वळखंडे,प्राचार्य एस.पी.माळी,पर्यवेक्षक टी.एस.पाटील,एस.आर.पाटील,आर.ए.पाटील,किशोर चौधरी,माया मराठे आदि तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी देखील अभिनंदन केले आहे.

0