आंतरराष्ट्रीय

अल्पवयीन मुलींच्या छेडखानीप्रकरणी आरोपीना शिक्षा

अमळनेर ;-चोपडा शहर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलींच्या छेडखाणी व पोस्को अंतर्गत १४ जून २०१८ रोजी दाखल गुन्ह्यातील तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक कांचन काळे यांची साक्ष महत्वाची ठरवून आरोपींना आज अमळनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली चोपडा शहर पो. स्टे. गु.र.न. 104/ 2018, स्पेशल पोक्सो केस नं.33/2018, गुन्हा कलम 354अ,ड.323,504,506 (2)34 भा.द.वि. व पोक्सो […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव

परिवहन अधिकारी कर्मचाऱ्यांकडून ९० टक्के जनतेची आर्थिक लूट

भारतीय वाहन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आरिफ खान यांचा आरोप जळगाव ;- – भारत सरकारने परिवहन विभागांतर्गत जे नवीन ॲप आणलेले आहे , भारतामध्ये डिजिटल इंडियाच्या नावावर काम होत आहे ,परंतु डिजिटल काम ज्याप्रमाणे पाहिजे तसे होत नाही त्यामुळे अधिकारी व कर्मचारी जनतेची दिशाभूल करून त्यामध्ये ९० टक्के लोकांची आर्थिक लूट करून फसवणूक होत असल्याचे आज […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव

पत्रकार कल्याण संस्था जिल्हाअध्यक्षपदी सुरेश कोळी

बोदवड ( प्रतिनिधी )अमरावती येथील पत्रकार कल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी बोदवड येथील पत्रकार सुरेश कोळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक शरद मेहरे यांनी कोळी यांना नियुक्तीपत्र दिले आहे. अखिल पत्रकार कल्याण बहुउद्देशीय संस्था पत्रकारांच्या कल्याणासाठी राज्य पातळीवर कार्यरत असणाऱ्या संस्था असून राज्यातील विविध जिल्हा संस्थेच्या शाखा आहेत राज्यभरात संस्थेने पदाधिकारी नियुक्ती केली आहे. […]

आंतरराष्ट्रीय मुंबई राजकीय

फॅशन उद्योगामधील सर्वोत्तम शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्नशील – खा. रक्षाताई खडसे

दिल्ली – केंद्र सरकारने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या संचालकपदी खा. रक्षाताई खडसे यांची नियुक्ती केली आहे. खा. रक्षाताई खडसेंनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी च्या दिल्ली येथील कॅम्पसला भेट देऊन संस्थेच्या कामकाजाविषयी माहिती घेतली. फॅशन डिझायनिंग म्हणजे केवळ कपडे शिवणे नव्हे. त्यापलीकडेही अनेक गोष्टींचा अंतर्भाव यामध्ये असतो. शिवणाचे प्रकार, विविध प्रकारच्या टाक्यांचे प्रकार, टिपा […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव

घरकुल घोटाळ्यातील खान्देश बिल्डर्सच्या संचालकांना जामीन मंजूर

जळगाव ;- येथील बहुचर्चित घरकुल घोटाळ्यातील खान्देश बिल्डर्सचे संचालक राजा मयूर आणि जगन्नाथ वाणी या दोघांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. यापूर्वीच्या आरोपींची जामिनावर सुटका झालेली आहे. खान्देश बिल्डर्सचे संचालक राजेंद्र मयूर आणि जगन्नाथ वाणी यांना धुळे न्यायालयाने सात वर्ष शिक्षा आणि ४० कोटी रुपयांचया दंडाची शिक्षा सुनावली होती. या निकालाच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात अपील […]

आंतरराष्ट्रीय उत्तर महाराष्ट्र जळगांव

शेती ट्रान्सफार्मरच्या प्रश्नांसाठी आमदारांची शेतकऱ्यांसह वीज कार्यालयात धडक

व्हिडीओ कॉन्फरन्सने मुख्य अभियंता जळगाव यांच्याशी संवाद ; येत्या ८ दिवसात ट्रान्सफार्मरचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन चाळीसगाव – अवकाळी पावसाच्या अस्मानी संकटाने आधीच शेतकऱ्यांचे एक पिक वाया गेले आहे, त्यातच वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे २७ गावातील ट्रान्सफार्मर तीन ते साडेतीन महिन्यांपासून बंद आहेत. स्थानिक कर्मचारी हे शेतकऱ्यांकडून पैश्यांची मागणी करत आहेत. अश्या परिस्थितीत दुसरे पिक […]

उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

बसचालकाला मारहाण करणाऱ्याला सश्रम कारावास

जळगाव ;– बसचालकाला दमदाटी करून मारहाण करणार्याला आज न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा आज सुनावली . याबाबत माहिती अशी कि ९ जुलै २०१६ रोजी बस क्रमांक एमएच२० बीएल १४३३ ने चोपडयाहून जळगावला ईंदगाव मार्गे येत असताना शिवाजी नगर भागातील गेंदालाल मिल परिसरात बस आल्यावर संशयित आरोपी नरेंद्र संतोष नाडे रा. गेंदालाल मिल परीसर यांने गेंदालाल मिल […]

उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

नांद्रा येथे कर्जबाजारी शेतकऱ्याने केली रेल्वेखाली आत्महत्या

पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील नांद्रा येथील सखाराम दुशाल पवार वय – (६७) या वृद्ध शेतकऱ्याने आज दि.१२ सकाळी ८ च्या सुमारास त्यांच्या शेतालगत असलेल्या रेल्वे लाईन वर स्वंताला झोकून आत्महत्या केल्याची घटना घडली. अत्यंत गरीबीची परीस्थीती विविध कार्यकारी सोसायटी चे कर्ज होते. या वर्षी झालेल्या भिज पाऊसात रहाते घर सुद्धा पडले पंचनामा होऊनही कोणतीही शासकीय […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव

तिहार जेल’ने बोलावले दोन जल्लाद, निर्भयाच्या दोषींना लवकरच फाशी?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ): संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या दिल्लीच्या ‘निर्भया’ प्रकरणातल्या दोषींना फाशी कधी होणार? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. निर्भया प्रकरणातील चारही दोषी दिल्लीच्या तिहार जेलमध्ये कैदेत आहेत. विनय शर्माच्या दया याचिकेवर राष्ट्रपतींकडून लवकरच निर्णय येण्याची शक्यता आहे. अस असतानाच आता उत्तर प्रदेशहून तिहार जेलमध्ये दोन जल्लादांना बोलवण्यात आलं आहे. मेरठमधील पवन जल्लाद यांना […]

मुंबई राजकीय

उद्धव ठाकरे सरकारचे अखेर खातेवाटप जाहीर

मुंबई : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अखेर दोन आठवड्यानंतर सरकारचे खातेवाटप जाहीर झालं आहे. गृह आणि नगरविकास खात्यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू होती. त्यामुळे खातेवाटपाचं घोडं अडलं होतं. अखेर गृह आणि नगरविकास खातं हे शिवसेनेला मिळालं आहे. तर राष्ट्रवादीच्या पदरात वित्ता, जलसंपदा, ग्रामविकास आणि गृहनिर्माण ही महत्त्वाची खाती पडली आहेत. काँग्रेसला महसूल, […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव

पाचोरा ,एरंडोल तालुक्यात गारपिटीचा फटका

जळगाव ;- पाचोरा,एरंडोल तालुक्यातील उत्राण ,परधाडे ,दुसखेडे ,वडगाव येथे आज १२ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली . यावेळी गारपीटही झाल्याने नागरिकांची त्रेधात्रिपिट उडाली होती . अचानक आलेल्या या पावसाने वातावरणात गारठा निर्माण झाला होता. 2+