उत्तर महाराष्ट्र जळगांव मुंबई राजकीय

एकनाथराव खडसे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

नवी दिल्ली(वृत्तसंस्था ) – भाजपाचे नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी भेटीगाठींचा धडाका लावला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची नवी दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतल्यानंतर खडसे आज मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाणार आहेत. विशेष म्हणजे आपली खदखद व्यक्त करण्यासाठी दिल्लीला गेलेले खडसे भाजपाच्या एकाही नेत्याला भेटल्याशिवाय मुंबईत परतणार आहेत. खडसेंच्या या भेटीगाठीच्या दौऱ्यावरुन […]

उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची कार अज्ञात चोरट्याने लांबविली

जळगावातील खेडी शिवारातील घटना ; पॅन्टमधील 4 हजाराची रोकडही लंपास जळगाव- लोखंडी पाईपच्या साहाय्याने सुरुवातील खिडकीत टांगलेली पॅन्ट काढली. या पॅन्टमधील चाबीने ट्रान्सपोर्ट व्यावसायिक स्वप्निल रामचंद्र पवार रा. खेडी शिवार यांची अंगणात उभी कार चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान चोरट्यांनी पॅन्टच्या खिशातील 4 हजाराची रोकड काढून पॅन्ट अंगणात टाकून पोबारा केल्याची माहिती […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव राजकीय

म्हसवे ग्रामपंचायतीवर सेनेच्या परिवर्तन पॅनलचा झेंडा

पारोळा –तालुक्यातील म्हसवे गावाच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेच्या परिवर्तन पॅनलने राष्ट्रवादी समर्थक महा विकास आघाडीचा धुव्वा उडवीत सरपंच पदाच्या उमेदवारास एकूण ११ पैकी ११ जागावर एकतर्फी विजय प्राप्त केला. राष्ट्रवादीच्या दहा वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला. विशेष म्हणजे राज्यात राष्ट्रवादी व सेना महाविकास आघाडीत मित्र पक्ष असताना मात्र म्हसवे निवडणुकीत एकमेकाचे कट्टर विरोधक समजले गेले. दि.८ रोजी […]

आंतरराष्ट्रीय राजकीय

लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक सादर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) बहुचर्चित नागरिकत्व सुधारणा विधेयक आज लोकसभेतमध्ये सादर करण्यात आले आहे. त्यानंतर विरोधकांनी गदारोळ सुरू केला आहे. विधेयकाला काँग्रेससह डावे, तृणमूल काँग्रेस यांच्यासह अनेक पक्षांकडून विरोध करण्यात आला आहे. त्याला उत्तर देताना गृहमंत्री अमित शहा यांनी या संदर्भात चर्चा करण्याची तयारी असल्याचे अमित शाह म्हणाले आहेत. पण, काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव

लोकशाही नागरी मंच तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

जळगाव: कलम ३७० हटविण्यात आल्यापासून काश्मिरी जनतेमध्ये भीतीचे वातावरण असून सरकारकडून दडपशाही सुरु आहे. कलम ३७० हटवून १२५ दिवस झाले आहे. मात्र तेथील खरी परिस्थिती ही काय आहे? हे जनतेसमोर येऊ दिले जात नसल्याने लोकशाही नागरी मंच तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. काश्मिरी जनतेच्या मुलभूत नागरी हक्कावर सरकार गदा आणत असल्याने यावेळी […]

उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

जन्म दिवशीच अपघातात जखमीचा मृत्यूशी झुंज

पाचोरा – भडगांव दरम्यान अपघात:आरोग्य दुताने वाचविले प्राण पाचोरा (प्रतिनिधि) – भडगांव ते पाचोरा रस्त्यावर स्विफ्ट गाडीने जोरदार धडक देऊन मेडिकल मालकाला गंभीर जखमी करून स्विफ्ट चालक फरार झाला आहे. पाचोरा शहरातील बनोटीवाला फार्म हाऊस पुढे भडगांव कडुन मोटरबाईक वर भडगांव येथील महाजन मेडिकल चे संचालक ऋषिकेश संभाजी महाजन (२१) हा पाचोरा येथे घरी येताना […]

मुंबई राजकीय

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी एक झाडही तोडले जाणार नाही-उध्दव ठाकरे

औरंगाबाद;- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबादेतील स्मारकासाठी झाडांची कत्तल होणार असल्याचे बोलले जात आहेत. आता या स्मारकासाठी एक झाडही तोडू नका, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री फोनवरून चंद्रकांत खैरे, औरंगाबादचे नागपूर नंदू घोडले आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी हा आदेश दिल्याचे समजते. त्यामुळे […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव सामाजिक

रोट्रॅक्ट क्लब जळगावचा अभिनव उपक्रम 

जळगाव ;- शहरातील नवीन बस स्टँड समोर वाहुतक नियमांचे पालन करा असे स्टिकर रोट्रॅक्ट क्लब तर्फे रिक्षांवर लावण्यात आले . तसेच वाहतूक पोलीस कर्मचारी यांना क्लब तर्फे तोंडाला लावण्याचे मास्क वाटप करण्यात आले. यासाठी आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते हे स्टिकर लावण्यात आले, व मास्क चे वाटप करण्यात आले. तसेच रोट्रॅक्ट तर्फे आमदार सुरेश भोळे […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव मुंबई राजकीय

भाजपच्या विभागीय आढावा बैठकीला पंकजा मुंडे गैरहजर

मुंबई ;- पंकजा मुंडे मराठवाड्याच्या महत्वाच्या बैठकीला येणार नाहीत, त्या आजारी असून 12 तारखेच्या मेळाव्याची तयारी त्या करत असल्यानं येऊ शकणार नाहीत असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. नवीन सरकार, आधीच्या सरकारच्या योजना धडाधड रद्द करत आहे. 25/15 हे गावातील अंतर्गत रस्त्यांचे प्रकल्प रद्द केले, गावतील लोकांनी आता पेढे वाटायचे की अकरोष करायचा.1200 कोटींची पिण्याच्या […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव सामाजिक

इंदिरा जाधव यांची ग्लोबल फाउंडेशनवर नियुक्ती

जळगाव : महिलांच्या हक्कासाठी कार्य करणारी ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशन संस्था ,नागपूर या संस्थेच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी जळगाव येथील कवियत्री ,महिलांसाठी कार्य करणाऱ्या सौ .इंदिरा गजानन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे .ग्लोबल संस्थेच्या संस्थापक मनिषा ठाकरे यांनी जाधव यांची नियुक्ती केली. त्याबद्दल इंदिरा जाधव यांचे हॉबी क्लब , कवी व सामाजिक कार्यकर्ते तुषार वाघुळदे , […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव शिक्षण

४ जानेवारीला विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २८ वा दीक्षांत समारंभ शनिवार, दि.४ जानेवारी,२०२० रोजी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात सकाळी १० वाजता होणार आहे. २८ वा दीक्षांत समारंभाकरिता ज्या स्नातकांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे पदवी/पदवीका प्रमाणपत्र मिळणेकरिता आवेदनपत्र जमा केले आहे, अशा पात्र स्नातकांची पदवी/पदविका प्रमाणपत्रांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. दीक्षांत समारंभाच्या दिवशी जे […]