आंतरराष्ट्रीय मुंबई राजकीय

फॅशन उद्योगामधील सर्वोत्तम शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्नशील – खा. रक्षाताई खडसे

दिल्ली – केंद्र सरकारने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या संचालकपदी खा. रक्षाताई खडसे यांची नियुक्ती केली आहे. खा. रक्षाताई खडसेंनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी च्या दिल्ली येथील कॅम्पसला भेट देऊन संस्थेच्या कामकाजाविषयी माहिती घेतली. फॅशन डिझायनिंग म्हणजे केवळ कपडे शिवणे नव्हे. त्यापलीकडेही अनेक गोष्टींचा अंतर्भाव यामध्ये असतो. शिवणाचे प्रकार, विविध प्रकारच्या टाक्यांचे प्रकार, टिपा […]

मुंबई राजकीय

उद्धव ठाकरे सरकारचे अखेर खातेवाटप जाहीर

मुंबई : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अखेर दोन आठवड्यानंतर सरकारचे खातेवाटप जाहीर झालं आहे. गृह आणि नगरविकास खात्यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू होती. त्यामुळे खातेवाटपाचं घोडं अडलं होतं. अखेर गृह आणि नगरविकास खातं हे शिवसेनेला मिळालं आहे. तर राष्ट्रवादीच्या पदरात वित्ता, जलसंपदा, ग्रामविकास आणि गृहनिर्माण ही महत्त्वाची खाती पडली आहेत. काँग्रेसला महसूल, […]

मुंबई राजकीय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतले एकविरा आईचे दर्शन

पुणे (वृत्तसंस्था );- ठाकरे घराण्याचं कुलदैवत असलेल्या एकविरा देवीच दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सहकुटूंब कार्ला गडावर पोहचले. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी सहकुटूंब एकविरा देवीच दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरेंची उपस्थिती होती. कार्ला येथील एकविरा देवी ही ठाकरे कुटुंबीयांची कुलदैवत आहे. […]

मुंबई राजकीय

भाजपा माझ्या बापाचा पक्ष – पंकजा मुंडे

परळी (वृत्तसंस्था );- पंकजा मुंडे यांनी भाजपा माझ्या बापाचा पक्ष आहे सांगत बंडखोरी करणार नसल्याचं जाहीर करत पक्षविरोधी भूमिका घेण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मन मोकळं केलं नाही तर शरीरात विष तयार होतं असंही यावेळी त्यांनी सांगितलं. दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमत्त गोपीनाथगडावर आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी समर्थकांशी संवाद साधत जोरदार भाषण केलं. […]

आंतरराष्ट्रीय मुंबई

आशियातील सर्वात सेक्सी अभिनेत्री ठरली आलिया, दिपीका दुसऱ्या स्थानावर

मुंबई (वृत्तसंस्था );- बॉलिवूडमधील सर्वच अभिनेत्री या सुंदर आहेत. सर्वांचीच फॅन फॉलोइंग जास्त आहे. फक्त भारतातूनच नाही तर जगभरातून बॉलिवूड अभिनेत्रींना पसंती दिली जाते. काही दिवसांपूर्वीच आशियातला सर्वात सेक्सी पुरुष म्हणून बॉलिवूडचा अभिनेता आणि डान्स मास्टर हृतिक रोशनची निवड करण्यात आली होती. आता आशियातल्या सर्वात सेक्सी महिलेची निवडही करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच ब्रिटनच्या ‘इस्टर्न […]

आंतरराष्ट्रीय मुंबई राजकीय

राजीनामा दिला त्या दिवशीही माझ्या चेहऱ्यावर हास्य  होते -एकनाथराव खडसे

बीड : ‘माझ्या जीवनामध्ये गोपीनाथ मुंडे यांना अनन्यसाधारण स्थान आहे. त्यांच्या सहवासात वर्षानुवर्ष काढल्यामुळे अनेक संस्कार आमच्यावरही झाले, असं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. ‘मी नेहमीच हसरा असतो, माझा चेहरा कायम प्रसन्न असल्याचं अनेकांचं म्हणणं असतं. अगदी राजीनामा दिला त्या दिवशीही माझ्या चेहऱ्यावर काही दुःख नव्हतं, हास्य होतं’, असेही ते म्हणाले. आज […]

मुंबई राजकीय

शिवसेनेने काय भूमिका घ्यावी हे कोणी शिकवू नये – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था );- शिवसेनेनं काय भूमिका घ्यावी हे कोणीही शिवसेनेला शिकवू नये. शिवसेनेनं आपली सतत आपली भूमिका मांडली आहे. शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाबाबत जोवर स्पष्टता येणार नाही, तोवर त्याला पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. शिवसेनेनं लोकसभेत या विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं याचं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. […]

मुंबई राजकीय

नाथाभाऊ काँग्रेसमध्ये आले तर उत्तमच – बाळासाहेब थोरात

मुंबई (वृत्तसंस्था ): भाजपचे ज्येष्ठ नेते नाथाभाऊ काँग्रेसमध्ये आले तर उत्तमच होईल, असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. भाजपने त्यांचे आमदार कुठे जातील याची काळजी करावी, असा टोला थोरात यांनी लगावला आहे. दरम्यान, दिल्लीत गेलेले खडसे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. आज ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची […]

आंतरराष्ट्रीय मुंबई राजकीय

लोकसभेत जे झालं ते विसरून जा; कॅब संदर्भात संजय राऊतांचा भाजपला इशारा

नवी दिल्ली(वृत्तसंस्था ): नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत (CAB) शिवसेनेकडून राज्यसभेत वेगळी भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना तसे संकेत दिले. राऊत यांनी म्हटले की, लोकसभेत जे झालं ते विसरून जा. आम्ही नागरिकत्व सुधारणा विधेयकात काही सुधारणा सुचवल्या होत्या. याबद्दल आम्ही राज्यसभेत प्रश्न उपस्थित करू, असे राऊत यांनी सांगितले. […]

आंतरराष्ट्रीय मुंबई राजकीय

भारताची वाटचाल मेक इन इंडियावरुन रेप इन इंडियाकडे- खा.  अधीर रंजन चौधरी

नवी दिल्ली ;- हैदराबाद सामूहिक बलात्कार घटनेनंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला असून लोकसभेतही याचे पडसाद उमटले आहेत. काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभेत महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन बाळगण्यावरुन त्यांनी नाराजी व्यक्त करत भारताची वाटचाल मेक इन इंडियावरुन […]

आंतरराष्ट्रीय मुंबई राजकीय

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हा भारतीय संविधानावरील हल्ला

खा. राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा नवी दिल्ली (वृत्तसंस्था )काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नागरिकत्व विधेयकावर नाराजी व्यक्त करत समर्थन करणाऱ्यांवर टीका केली आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हा भारतीय संविधानावरील हल्ला आहे अशा शब्दांत राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत मांडलं आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आठ तासांच्या […]