आंतरराष्ट्रीय

‘ध्रुवस्त्र’ची चाचणी यशस्वी

 ओडिशाच्या बालासोरमध्ये ध्रुवस्त्र या अँटी-टँक मिसाईलची चाचणी घेण्यात आली. हेलिकॉप्टरमधून लाँच करण्यात येणा-या नाग मिसाईल (हेलिना)चेच नाव आता ध्रुवस्त्र करण्यात आले आहे. ही चाचणी घेताना मात्र हे मिसाईल हेलिकॉप्टरमधून न सोडता, मिसाईल लाँचरमधून सोडण्यात आले.

१५ आणि १६ जुलैला या चाचण्या पार पडल्या. गेल्या वषीर्ही जुलैमध्ये पोखरण फायरिंग रेंजमध्ये या नाग मिसाईलची चाचणी घेण्यात आली होती. १९८०मध्ये सुरू झालेल्या एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत विकसित करण्याच्या नियोजित पहिल्या पाच सामरिक क्षेपणास्त्रांपैकी एक हे नाग होते. या कार्यक्रमांतर्गत तयार केलेल्या इतर क्षेपणास्त्रांमध्ये अग्नी, पृथ्वी आणि आकाश यांचा समावेश आहे.

error: Content is protected !!