आंतरराष्ट्रीय

पतीने नोटीस पाठवून मागितले १०० कोटी

प्रतिनिधी/बातमीदार:-
              एका व्यक्तीने पत्नीच्या १४ प्रियकरांना नोटीस पाठवून तब्बल १०० कोटींची मागणी केल्याची घटना कोलकातामध्ये घडली आहे. कोलकातायेथील एका व्यावसायिकाला आपल्या पत्नीवर विवाहबाह्य संबंधाचा संशय आला. पत्नीचा पाठलाग केल्यानंतर त्याला विवाहबाह्य संबंध असल्याचे दिसून आले. पण समोर आलेले सत्य धक्कादायक होते. पत्नीचे एक, दोन नव्हे तब्बल १४ प्रियकर असल्याचे पतीला समजले. सुरुवातीला पतीच्या पायाखालील जमीनच सरकली. पण त्यानंतर त्या व्यावसायिकाने जे केले त्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल.

पत्नीचे १४ प्रियकरासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे पतीला समजले. त्यानंतर पतीने सर्व प्रियकराला नोटीस पाठवली असून १४ जणांकडे १०० कोटी रुपयांची नुकसानभरवाईची मागणी केली आहे. कारण त्या १४ जणांमुळे त्याचे वैवाहिक आयुष्य विस्कळीत झाले आहे.

नोटीसमध्ये व्यावसायिकाने म्हटलेय की, नोटीस मिळाल्यानंतर दोन आठवड्यात मला १०० कोटी रुपये द्यावे. जर रक्कम मला मिळाली नाही तर कायदेशीर कारवाई करेल. मला समजलेय की माझ्या पत्नीबरोबर तुमचे शारिरीक संबंध आहेत. तुमच्यामुळे माझे वैवाहिक आयुष्य खराब झाले असून समाजातही माझी प्रतिमा धुळीस मिळाली आहे.

error: Content is protected !!