गुन्हा

गोवंश जातीचे कत्तली केलेल्या जनावरांचे खुरे, हाडे व कातडी विना परवानगी बाळगणाऱ्या आरोपीस अटक

गोवंश जातीचे कत्तली केलेल्या जनावरांचे खुरे, हाडे व कातडी विना परवानगी बाळगणाऱ्या आरोपीस अटक
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

भुसावळ शहरात आगाखानवाडा,कत्तलखान्याजवळ महाराष्ट्र शासनाने गोवंश हत्या बंदी घातलेली जनावरे विक्री करण्यासाठी किंवा त्यांचे कत्तली घडवून आणण्याचे उद्देशाने एका पांढ-या रंगाचे MH -४० -N-२९९८ नंबरच्या महिंद्रा पिकअप व्हँनमध्ये जनावरे आणली असल्याची गुप्त बातमी बाजारपेठच्या निरीक्षकांना त्यांनी सपोनि अनिल मोरे व गुन्हे शोध पथकाला पाठवून गोवंश जातीचे कत्तली केलेल्या जनावरांचे खुरे, हाडे व कातडी विना परवानगी बाळगणाऱ्या आरोपीस ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, फिर्यादी पोकॉ.श्रीकृष्ण खंडेराव देशमुख वय -३५ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहरात विना परवानगी महाराष्ट्र शासनाने गोवंश हत्या बंदी घातलेली जनावरे विक्री करण्यासाठी किंवा त्यांचे कत्तली घडवून आणण्याचे उद्देशाने दिनांक २९ जुलै २०२० रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास एका पांढ-या रंगाचे MH-४० -N-२९९८ नंबरच्या महिंद्रा पिकअप व्हँनमध्ये जनावरे आणली असल्याची गुप्त बातमी निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळल्यावरून सपोनि अनिल मोरे, पोना.रमण सुरळकर, पोना. किशोर महाजन, पोना. समाधान पाटील,पोकॉ ईश्वर भालेराव,पोकॉ प्रशांत परदेशी,पोकॉ.विकास सातदिवे, पोकॉ. श्रीकृष्ण देशमुख अशांना घटनास्थळी पाठवून सापळा रचून सदर ठिकाणी पोहचुन खात्री केली असता MH-40-N-2698 नंबरची पांढ-या रंगाची महिंद्रा पिकअप व्हॅन जवळ एक इसम संशयास्पद परिस्थीतीत हालचाली करीत असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले.
सदर गाड़ीज़वळ उभ्या असलेल्या ईसमाच्या जवळ जाऊन त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांने आपले नाव  सादिक खान रशिद खान वय 35 रा.रामटेकपुरा आंबोळी बेस,ता.अकोट,जिल्हा-अकोला असे सांगीतले.पोलिसांनी ताब्यात असलेल्या पिकअप व्हॅनचे वरिल व मागील बाजूने लावलेली पिवळ्या रंगाची ताडपत्री उघडुन दाखविण्याचे सांगताच तो आम्हाला ” जाने दो ना साहब, हम गरिब लोग है,पेट-पानी के लिए यहा आए है, जो भी बात है वो यही निपटा लेते ‘ असे बोलु लागला. म्हणुन स.पो.नि.अनिल मोरे यांनी इसमास त्या गाडीची ताडपत्री उघडली असत तिचे बॉडीमध्ये मागील बाजुस गोवंश जातीचे कत्तली केलेल्या जनावरांचे खुरे, हाडे व कातडी असे मिळुन आली.यावरुन तो शासनातर्फे बंदी असलेल्या गोवंश जातीचे जनावरांचे बेकायदेशीर खरेदी-विकी करणा-या किंवा स्वतःचे आर्थीक फायद्यासाठी गोवंश जनावरांची कत्तली करणा-या लोकांचे टोळीत सामील असल्याचे संशय बळावल्याने त्यास ११:३० वाजता पुढील कायदेशीर कार्यवाही करीत ताब्यात घेण्यात आले आहे.त्यांचे ताब्यातील पिकअप व्हँनमध्ये गोवंश जातीचे जनावरांची कत्तल केल्यानंतर मिळुन आलेल्या मुद्देमाल

१) २,२०,००० / रु किंमतीची कत्तली केलेल्या गोवंश जातीचे जनावरांची खुरे,हड्या व कातडी
2) ३.००.०००/  रु.किमतीची एक महिंद्रा कंपनीची MH-४०-N-२६९८ नंबरची पांढ-या रंगाची पिकआप व्हॅन जु.वा.कि.अ. ५,२०,०००/- एकुण किंमत कोणत्याही कायदेशीर परवानी शिवाय ताब्यात बाळगत असतांना मिळून आले म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनला आरोपी विरुध्द महाराष्ट्र अँनिमल प्रिझर्वेशन अँक्ट (सुधारणा )1995 चे कायदा कलम 5 [अ ] [1][2] 5 [ब) 5 [क] 7,7 [अ ].[ब) 9 [अब] 11 सह भा.द.वि. स.कलम 429 तसेच भा.प्रा.नि.वा.प्र.का. सन 1960 चे कलम 11 [1] प्रमाणे बाजारपाठचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि अनिल मोरे करीत आहे.

error: Content is protected !!