आरोग्य उत्तर महाराष्ट्र जळगांव

अत्यावस्थ कोविड पॉझीटीव्ह विशाल चितोडकरांनी जिंकली कोरोनाची लढाई

कोरोनाच्या गंभीर रुग्णास वाचविण्यात डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाला यश

काळ आला होता पण वेळ आली नव्हती आधुनिक सावित्रीने दिले पतीला जिवदान

जळगाव / प्रतिनिधी

संकट आले की चारी बाजूने येतात. कधी तर जिवावर देखिल बितते. असाच प्रसंग अत्यावस्थ विशाल चितोडकर या युवकावर आला. म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती . या युवकाने कोरोनावर मात करत लढाई जिकंली आणि आधुनिक सावित्रीने सेवेच्या बळावर पतीला जिवदान दीले. त्यांना साथ मिळाली ती डॉ उल्हास पाटील डेडीकेटेड कोविड सेंटरची.
जळगावातील ओम क्रिटीकलमध्ये विशाल चितोडकर यांच्यावर काही दिवसापुर्वी डॉ स्वप्नील पाटील यांनी मेंदूची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना डॉ. डाबींकडे हलवण्यात आले. तेथील डॉक्टर व कर्मचारी पॉझीटीव्ह आल्याने रूग्णांना इतरत्र हलवण्यात आले. यातच विशाल चितोडकर त्या रूग्णालयात उपचार घेत असतांना कोरोना पॉझीटीव्ह झाला. एकापाठोपाठ हे संकट आल्याने बायको देेखील घाबरून गेली होती. अशातच राजेश यावलकर यांच्याशी संपर्क आल्याने त्यांनी गोदावरीचे जनसंपर्क अधिकारी राहूल कुळकर्णी व प्रमोद भिरूड यांचेशी चर्चा करून पहाटे दीड वाजता दाखल केले. मेंदूवर नुकतीच शस्त्रक्रिया झाल्याने या रूग्णाला व्हेल्टीलेटर्स उपलब्ध करून देत रातोरात त्यांच्यावर उपचार सूरू करण्यात आले. या रूग्णांवर झालेल्या शस्त्रक्रियेमूळै त्याची रोगप्रतिकार शक्ती अगदी कमी झाली असतांना त्यांच्या पत्नी प्रिती यांची टेस्ट निगेटीव्ह येउनही आपल्या पतीची रूग्णालयात थांबून सेवा केली. १५ दिवसाच्या यशस्वी उपचारानंतर हा तरूण आज कोरोनामुक्त होत लढाई जिकंला. याच बरोबर या रूग्णावर येथील मेंदू व मणका तज्ञ डॉ. स्वप्नील पाटील, फिजीशियन डॉ चंद्रया कांते, पाराजी बाचेवार, तसेच डॉ. केतकी पाटील, हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील यांच्या समन्वयातून २४ तास लक्ष ठेवण्यात आले. या लढाईतही तो जिंकला म्हणूनच कोणीतरी म्हटले आहे की काळ आला होता पण वेळ आली नव्हती आणि आधुनिक सावित्रीने आपल्या पतीला यमराजाकडून परत खेचून आणले याचा प्रत्यय नुकताच येउन गेला.

error: Content is protected !!