आंतरराष्ट्रीय

@ कोरोनाचा संसर्ग परत दुसऱयांदा होऊ शकतो का? डिस्चार्ज करतांना निगेटिव्ह असल्याची टेस्ट का केली जात नाही ? कोरोनात पोटावर झोपणे फायद्याचे असते का ? कोरोनाची लक्षणे हि किती दिवस त्रास देऊ शकतात ? ह्या व इतर अनेक बाबी उलगडून सांगणारा हा डॉ नरेंद्र व डॉ . गीतांजली ठाकूर ह्यांचा लेख ! @ कोरोनासंसर्ग मुक्तीनंतरची काळजी !

कोरोनसंसर्गमुक्ती नंतरची काळजी !

कोरोनाला आपल्या आयुष्यात येऊन चार महिने उलटले ! सुरुवातीला कोरोनाचे १०० टक्के रूप उलगडेलच नाही , त्यात हा विषाणू बहुरूपी !
कधी कुठल्या लक्षणांच्या माध्यमात शरीरात प्रवेश करण्याचे संकेत देईल हे हि अनिश्चित !
पण आता प्रशासन , शासन व आरोग्य क्षेत्रातील कर्मयोगी ह्यांच्या अथक प्रयत्नाने कोरोनाला हरविण्यास आपण सज्ज होत आहे ! व कोरोनामुक्त झालेल्यांच्या प्रमाणात होणारी वाढ हि सर्वसामान्य नागरिकांमध्ये आत्मविश्वासाचे बळ देण्यासाठी शुभ संकेत ठरत आहे !
महाराष्ट्र राज्यातील कोरोनाबाधीतांची संख्या ४ लाखाच्या आसपास असेल तर त्याचवेळेस कोरोनामुक्तांची संख्या जवळजवळ २ लाखाच्या वर पोहोचली आहे !
जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची आजपावेतो संख्या हि १०००० च्या वर असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ६००० च्या आसपास आहे !
पण हे लक्षात घेतले पाहिजे कि हि आकडेवारी ज्या कोरोना पॉसिटीव्ह रूग्ण ह्यांची आहे जे लक्षण विरहित होते किंवा अति सॊम्य व सॊम्य लक्षणांनी ग्रस्त असून घरीच अलगीकरण कक्षात किंवा संस्थात्मक अलगीकरण किंवा केअर सेंटर मध्ये उपचार घेत होते !
व हि आकडेवारी आजाराच्या दहाव्या दिवसानंतर कोरोनामुक्त झालेल्यांची ,मोठ्या संख्येची प्रतीक आहे !
मूळ मुद्दा ह्यामागे असा कि जरी हे रुग्ण कोरोनामुक्त झाले तरी आगामी ३ ते ४ महिन्याच्या काळात ह्यातील काही रुग्णाना विविध आजाराच्या समस्यांना व कुरबुरींना सामोरे जावे लागते , म्हणजेच कोरोना ची काही लक्षणे काही कोरोनाबाधितांमध्ये नंतरच्या ३ते ४ महिन्यात दिसू शकतात त्यावेळेस घाबरून न जाता काय काळजी घेणे जरुरीचे आहे व त्यावरील उपचार कोरोनासारखे ( संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेण्याच्या विविध पद्धती ) न घेता इतर आजारासारखे घ्यावेत , म्हणजे सोप्या भाषेत ह्या नंतरच्या काळात नेहमीच्या पद्धतीप्रमाणे नॉन – कोव्हीड रुग्णालयात घेणे हे ( अलगीकरण किंवा विलगीकरण न करता )महत्वांचे आहे ! व डॉक्टरांनी तसे उपचार सहजतेने देणे महत्वाचे आहे !
एकंदरीत कोरोना ह्या विषाणूच्या आजाराचे दोन स्टेप्स आहेत , पहिली कोरोना संसर्गाची ( दहा दिवसापर्यंत )
व दुसरी कोरोनानंतर अर्थात कोरोनामुक्त ( संसर्गातून ) झाल्यानंतरच्या चार महिन्याची !
@@पण नेमके कोरोनामुक्त म्हणजे काय ? दहावा दिवस कसा मोजावा व नंतर टेस्ट का करत नाही ते आधी समजून घेऊ या !
(अ )कुठलीही लक्षणे किंवा त्रास किंवा शरीरातील बदल ज्यादिवशी त्या रुग्णा च्या पहिल्यांदा ध्यान्यातआले असतील ( टेस्ट कधी केली ते दुर्लक्षित करून ) तो दिवस पहिला म्हणून मोजावा लागतो व नवव्या दिवसापर्यंत ह्या आजाराचा कोर्स जर सामान्यपणे राहिला असेल तर ( रुग्णास काही मेजर प्रॉब्लेम आला नसेल ) तर दहाव्या दिवशी कुठलीही टेस्ट न करता त्यास कोरोना संसर्गातून मुक्त झाला असे समजण्यात येते !
(ब ) गत दहा दिवसांत जर काही त्रास नसेल व RTPCR टेस्ट निगेटिव्ह असेल !
( क) गत दहा दिवसात काही त्रास नसेल व अँटीबॉडी टेस्ट पॉसिटीव्ह असेल तरी तो रुग्ण कोरोनामुक्त झाला नव्हे तर कोरोना संसर्गातून मुक्त झाला असे म्हणता येते !
ह्याचाच अर्थ असा व्यक्ती हा कोरोना संसर्ग फैलावत नाही व तो आता नॉन इंफेशियस असतो ! आपल्या देशात अतिरिक्त काळजी म्हणून अश्या व्यक्तीना पुढील सात दिवस विलगीकरणा त राहण्याचा सल्ला देतात !
पण ज्या व्यक्ती अत्यावश्यक सेवेत आहेत जसे कि डॉक्टर्स , नर्सेस , आरोग्यसेविका , अधिकारी व इतर सेवेकरी ह्यांना सामान्य परिस्थितीत दहा दिवसानंतर काम करण्यास हरकत नसते !
त्यांच्या पासून संसर्ग पसरण्याची भीती अजिबात नसते !
आपल्या कुटुंबाशी व समाजाशी तो व्यक्ती सर्वसामान्य व्यक्तीसारखे पण नेहमीच्या प्रतिबंधनात्मक सवयी अंगीकारून मिसळू शकते !
@@@ दहाव्या दिवसानंतर जर RTPCR टेस्ट केली तर ती बर्याच वेळा पॉसिटीव्ह येऊ शकते कारण तो विषाणूचे अंश त्याठिकाणी असतात पण ते जिवंत नसतात !व त्यांची वाढ होण्याची प्रक्रिया थांबलेली असते !
ह्याचाच अर्थ शरीरात मृत विषाणू किंवा अँटीजेन असु शकते व हे दर्शविणार्या टेस्ट पॉसिटीव्ह येऊ शकतात पण अश्या स्थितीत ह्या व्यक्तीपासून संसर्ग पसरत नाही हे लक्षात घेतले पाहिजे !म्हणूनच शासकीय नियमावली नुसार कोरोनाबाधित रुग्णास डिस्चार्ज करताना तो रुग्ण निगेटिव्ह आहे कि नाही ह्याबाबत टेस्ट केली जात नाही !
फक्त ज्या कोरोनाबाधित रुग्णाना पहिल्या काही दिवसातच अतिदक्षतागृहाची , जास्त प्रमाणात ऑक्सिजन पुरविणाऱ्या उपचाराची ,कुत्रिम श्वास देणार्या मशीनची गरज पडली , सुरुवातीपासूनच गुंतागुंत झाली अश्या रुग्णाला ह्यातून अपवाद म्हणून ठेवावे लागते !
@ कोरोनाच्या दुसर्या टप्प्यात म्हणजे दहाव्या दिवसानंतर ते नंतरचे तीन चार महिने काही टक्के रूग्ण हेच काही लक्षणांनी प्रभावित होतात , इतरांना काही हि त्रास होत नाही !
३२ टक्के रुग्णांमध्ये एक दोन लक्षणे आढळतात तर १० टक्के रुग्णांमध्ये नंतरही बारीक ताप येतच राहतो व तो दीर्घ काळ येतो , ५३ टक्केंमध्ये थकवा हा जाणवत असतो ,त्याचबरोबर डोळे , कान , घसा , व कोरडा खोकला व अतिसार ह्यासंबंधीच्या तक्रारी राहू शकतात !
चव जाणे व वास न ओळखता येणे ह्या त्रासाला दीर्घ काळ तोंड द्यावे लागते !
ह्यात महत्वाचे व काळजी घेण्यासारखे म्हणजे दम लागणे !
छोट्या श्वासनलिका आकुंचन पावल्यामुळे क्रोनिक ब्रोनकायटिस हा आजार हा बळावू शकतो त्या मुळे शरीरातील प्राणवायू तपासण्यासाठी व ६ मिनिटे चालण्याची चाचणी करण्यासाठी पल्स ऑक्सिमीटर चा वापर नंतरच्या काळात पण केला पाहिजे !व ह्यातूनच सायलेंट हायपॉक्सियाला ओळखून गुंतागुंत टाळता येऊ शकते !
सायलेंट हायपॉक्सिया म्हणजे प्राणवायूचे प्रमाण कमी असूनही बरेच कोरोना बाधित रुग्ण हे स्वस्थ व आरामात असतात !
कोरोनाचा संसर्ग झाल्यावर कोरोनाबाधित रुग्णांनी शरीरातील प्राणवायूचे प्रमाण वाढविणेसाठी जी प्राणायाम , श्वसनाच्या प्रक्रिया ( पोटाने श्वास घेण्याची प्रक्रिया वाढविणे ) व उलटे म्हणजे पालथे झोपणे ( पोटावर झोपणे) व एका कुशीवर झोपणे हे सुरु केलेले असते ते काही महिने अजून सुरु ठेवले पाहिजे कारण हे कोरोनाच्या रुग्णासाठी फार हितकारक असते ! पोटावर झोपण्याची सवय अंगिकारल्यास फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेत वाढ होत असल्याचे व त्यामुळे रक्तातील प्राणवायूचे प्रमाण वाढण्यास मदत होत असल्याचे शास्त्रीय दृष्टया सिद्ध झालेले आहे !त्याचप्रमाणे असे झोपल्याने घोरण्याचे प्रमाण कमी होऊन श्वसनास येणारा अडथळा टाळण्यास मदत होते !
कोरोना विषाणू हा शरीरातील रक्त गोठण्याच्या प्रक्रियेवर सुद्धा काही अंशी एका विशिष्ट परिस्थितीत परिणाम घडवुन आणत असतो त्यामुळे कोरोना बाधित रुग्ण हे रक्त अति प्रमाणात गोठण्याच्या स्थितीत असतात! म्हणून इतर आजाराचे रुग्ण जसे कि ह्रदयविकाराने ह्रदयाची कार्यक्षमता कमी झालेले , कर्करोगग्रस्त , ह्रदयधमन्यांमध्ये स्टेण्ट टाकलेले , गर्भवती स्त्रिया व गर्भनिरोधक गोळ्या सेवन करणाऱ्या स्त्रिया ज्यामध्ये आधीच हि रक्त गोठण्याची प्रक्रिया अति प्रमाणात असते. अश्या रुग्णांनी काळजी घेणे आवश्यक असते !
अश्या रुग्णांनी रक्त पातळ राहील ह्यासाठी कार्य करणारे गोळया कोरोना संसर्गातून मुक्त झाल्यानंतर हि ४ महिने सेवन केल्या पाहिजेत , व अशी ओषधि चालू असल्यास त्या नियमित घेतल्या पाहीजेत !
मधुमेह , उच्च रक्तदाब , मूत्रपिंड विकाराने ग्रस्त व रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असणाऱ्या व अतिस्थूल असणाऱ्या व कोरोनाबाधितझालेल्या रुग्णांनी
जागरूक राहिले पाहिजे !
कोरोना ह्या विषाणू ने बाधित झाल्यानंतर काही रुग्णांमध्ये ह्र्दयाच्या मांसपेशीला इजा होण्याची शक्यता हि असते त्यामुळे ६ मिनिटे चालण्याच्या चाचणीत जर हृदयाचे ठोके हे अति प्रमाणात वाढले तर ECG व Echo करून घेणे गरजेचे असते !
कोरोनाचा संसर्ग हा लहान मुलांमध्ये कमी प्रमाणात होत असला व तो बरा होण्याचे प्रमाण हि जास्त असले तरी नंतरच्या काळात ‘ कावासाकी. आजारासारखे लक्षणे दिसण्याचे प्रमाण मात्र वाढलेले दिसत आहे व हि मुले गंभीर आजारी पडतांना दिसत आहे !
कोरोनानंतर हा आजार होत असल्यामुळे ह्यास कावासाकी ऐवजी ‘ कोरोसाकी ‘ असे हि म्हटले जात आहे ! शरीरातील अनेक अवयवांवर व अनेक संस्थेवर एकाच वेळी परिणाम घडविणारा हा रोगप्रतिकारशक्ती शी निगडित असलेला भयंकर आजार असल्यामुळे जे मुले कोरोनासंसर्गातून बाहेर आले आहेत त्यांच्यावर पालकांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे !
तापाबरोबरच पाठीवर व पोटावर चट्टे येणे , डोळे लाल होणे , तोंडाजवळ सूज येणे , बोटे सुजणे व जीभ लाल होऊन तिच्यावर पांढरे चट्टे पडणे ह्या प्राथमिक लक्षणांकडे पालकांनी गंभीरतेने लक्ष दिले पाहिजे !
एकंदरीत सकस व पोषक आहार , सकारात्मक जीवनशैली , पुरेशी व शांत झोप ह्या तीन चार महिन्याच्या कोरोनापश्चात काळात आवश्यक असते ! जर आपल्या आहारात पुरेसे पोषक व्हिटामिन्स व मिनरल्स नसतील तर ज्या गोळया व ओषधी आपण कोरोनाच्या काळात. घेण्यास सुरुवात केली आहे ती नंतरच्या ३-४ महिन्यापर्यंत घेतली पाहिजे !
कोरोनासंसर्गातून मुक्त झालेल्याना एक आत्मविश्वास
असतो कि पुन्हा हा कोरोना मला होणार नाही !मी आता ह्या रोगापासून सरंक्षित आहे!मी कसाही वागलो तरी आता मला काही एक भीती नाही आहे अशी भावना ह्या कोरोनासंसर्गमुक्त व्यक्तीमध्ये असते !
ह्याबाबतीत वैद्यकीय क्षेत्र व डॉक्टर मंडळी ह्यांचे मत जाणून घेतले पाहिजे !
हे खरे आहे कि आतापर्यंत च्या अभ्यासाअंती असे सिद्ध झालेले आहे कि एकदा कोरोना संसर्ग झाल्यानंतर परत कोरोनाची लागण होत नाही !
पण लक्षण विरहित किंवा अति सॊम्य लक्षणे असलेल्या कोरोनाबाधितांमध्ये रोगप्रतिकारशक्तीच्या अँटीबॉडीस तयार न होण्याची शक्यता हि नाकारता येत नाही त्याचप्रमाणे ज्या अँटीबॉडीस ह्या कोरोनाविरोधी लढ्यासाठी शरीरात तयार होतात त्या अल्पकाळ च टिकतात , त्यामुळे किती दिवस तो व्यक्ती परत कोरोना बाधित होण्यापासून सरंक्षित राहील हे सांगता येत नाही आहे ! असे विविध मतप्रवाह ह्याविषयी असल्यामुळे परत कोरोना होऊ हि शकतो कि नाही ? झाल्यास गंभीर स्वरूपाचा कि सॊम्य स्वरूपाचा हे अजूनही स्पष्ट होत नाही आहे !म्हणून परत कोरोना संसर्ग आपणास होणारच नाही , त्यामुळे बेफिकीर वागण्याचा परवाना मिळाला आहे असे समझून काळजी न घेणे हे चुकीचे पाऊल ठरेल !
कोरोना संसर्ग हा विषाणूमुळे होतो व ह्यात रुग्णाची प्रतिकारशक्ती वर विपरीत परिणाम होतो , त्यामुळे इतर विषाणुजन्य आजार व साथीचे आजाराची लागण होण्याची शक्यता जास्त असते !
वैयक्तिक स्वच्छता , मास्क वापराने , सार्व . ठिकाणी व रस्त्यावर थुंकण्याच्या सवयीत बदल करणे ह्या बाबी फक्त कोरोनाच्या संसर्गापासूनच नव्हे तर त्याहूनही घातक असलेल्या छातीच्या क्षयरोग , स्वाईन फ्लू व इतर श्वसन विकारांना रोखण्यासाठी महत्वाच्या आहेत !
त्यामुळे कोरोना मुक्ततेनंतर हि सर्व काळजी घेतली पाहिजे !
कोरोनाबाधित मित्र मैत्रिणींना
पाठविण्यात येत असलेला हा मेसेज ;
तुम ऊसे छू लो ओर वह तुम्हारा हो जाये ,
इतनी वफा तो सिर्फ कोरोना मै है !
गंमतीदार आहे पण जाणीव करून देणारा पण आहे कि हा कोरोना वफादार आहे , शरीरात एकदा आल्यानंतर काही वेळेस अल्प दिवस पाहुणचार घेतो तर काही वेळेस मात्र तीन चार महिने !
कोरोना येती शरीरा !अर्थात कोरोनासंसर्गामुळे शरीरात काही तरी बदल करणार होणार आहे व काही रुग्णांमध्ये ते तीन चार महिन्यापर्यंत जाणवणार आहे ह्याची दक्षता घेऊन पण संसर्ग पसरण्याची भीती न बाळगता कुठलेही एकांतवास न पाळता सौम्य लक्षणे असतील तर घरीच वगंभीर लक्षणे असतील तर लवकरात लवकर नॉन कोव्हीड रूग्णालयाकडे धाव घेऊन योग्य ते उपचार केले पाहिजे !!
डॉ नरेंद्र ठाकूर !

डॉ गीतांजली ठाकूर !
@ सुखकर्ता फाऊंडेशन , एरंडोल !

-14154″ />

करत असल्यामुळे व ह्यात ह्रदयावर पण परिणाम होत असल्याने , रक्त दाब कमी होत असल्यामुळे ह्या गंभीर अश्या आजाराकडे लक्ष देणे जरुरीचे आहे !
त्यासाठी लहान मुलांमध्ये कोरोनानंतर आढळत असलेल्या ह्या आजाराच्या लक्षणांबाबत पालकांनी जागरूक राहिले पाहिजे . नेहमीच्या ताप व इतर लक्षणांबरोबरच पाठ व पोटावर चट्टे येणे , हातापायाची बोटे सुजणे , डोळे लाल होणे, तोंडाजवळ सूज येणे , जीभ लाल होऊन जिभेवर पांढरे चट्टे पडणे , कातडी सोलली जाणे !
कोरोनाबाधित रुग्णांना एक गमंतीदार संदेश मित्रांकडून सध्या पाठविला जात आहे ;
तुम ऊसे छू लो ओर वह तुम्हारा हो जाये ,
इतनी वफा तो सिर्फ कोरोना मै है !!
पण एकदा कोरोना स्पर्श करून गेला कि परत तो आपल्याकडे येत नाही , कोरोनाची लागण आयुष्यात एकदाच होते ह्याबाबतीत अजून संशोधन चालू आहे व ह्याबाबत विभिन्न मतप्रवाह आहेत !
काही संशोधकांच्या मते कोरोना परत होत नाही तर काहींच्या मते अतिसौम्य व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये अँटीबॉडीस निर्माण होत नाही त्यामुळे अश्या रुग्णाला परत कोरोना होऊ शकतो !
कोरोना विषाणू विरुद्ध लढण्यासाठी शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडीस ह्या दीर्घ काळ टिकत नाही असे हि काही संशोधकांचे तर्क आहे !
त्यामुळे मला एकदा कोरोना झाला कि मी त्यापासुन सरंक्षित झालो ,आता माझे काही वाकडे तो करू शकणार नाही व बेफिकीर वागण्यास सुरुवात करणे हे हलगर्जीपणाचे आहे !
कोरोना संसर्ग हा त्या रुग्णाच्या रोगप्रतिकारशक्तीशी निगडित असा आजार असल्यामुळे अश्या रूग्णांना इतर विषाणूजन्य व संसर्गजन्य आजाराने प्रभावित होण्याची शक्यता ह्या काळात जास्त असते त्यामुळे काळजी घेणे महत्वाचे असते !
तोंडावर मास्क लावणे , सार्व . ठिकाणी , रस्त्यावर न थुंकणे , वैयक्तिक स्वच्छता पाळणे ह्या. प्रतिबंधनात्मक उपायांमुळे फक्त कोरोनालाच नाही तर त्याहूनि घातक अश्या छातीचा क्षयरोग, स्वाईन फ्लू ह्यांनाही रोखता येते !त्यामुळे कोरोना मुक्त ते नंतर हि ह्या सवयी अंगिकारल्या पाहिजेत !
‘ सारांश कोरोना हा काही रुग्णांमध्ये फक्त काही दिवसांचा पाहुणा असतो पण त्यावेळेस तो इतरांना होऊ शकतो , त्यामुळे त्यावर उपचार घेतांना संसर्ग होऊ नये म्हणून अलगीकरण व विलगीकरण करूनच काळजी घेतली पाहिजे पण काही वेळेस जर कोरोनाबाधित रुग्ण , दहा दिवसानंतर बरे झाल्यानंतर नंतरच्या तीन चार महिन्यात त्यांच्यात काही वरील लक्षणे आढळली व ती अतिसौम्य व सौम्य असतील तर घरीच व गंभीर स्वरूपाचे असतील तर
नॉन कोव्हीड हॉस्पिटल मध्ये उपचार केले पाहिजे व कोरोनाचा संसर्ग मात्र ह्या वेळेस पसरत नसल्यामुळे अलगीकरण व विलगीकरणाची व्यवस्था न करता , न घाबरता योग्य ते उपचार केले पाहिजे !
डॉ नरेंद्र ठाकूर !
डॉ गीतांजली ठाकूर !
सुखकर्ता फाऊन्डेशन , एरंडोल / जळगाव !

error: Content is protected !!