कल्याण गुन्हा

कल्याणात भडकला गॅंगवॉर ,खंडणीच्या वादातून गँगस्टार नन्नू शहा साथीदाराची हत्या करुन पसार

कल्याण : खंडणीच्या पैशांसाठी गँगस्टर धर्मेश उर्फ नन्नू शहा याने आपला मित्र जीग्नेश उर्फ मुन्या ठक्कर याची गोळ्या झाडून हत्या केल्याने कल्यानात गँगवॉर भडकण्याची शक्यता असून पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे .काल रात्रीच्या सुमारास कल्याण स्टेशन परिसरातील नीलम गल्लीत ही घटना घडली असून पोलिसांनी फरार गँगस्टर नन्नू शहा व त्याच्या साथीदाराचा शोध सुरू केला आहे
कल्याणच्या स्टेशन समोर असलेल्या निलम गल्लीत रात्री साडे नऊच्या सुमारास अचानाक अंधार झाला. लोकांना काही कळण्याच्या आत अंधारात गोळीबार ऐकऊन लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. या गल्लीत जिग्नेश ठक्कर उर्फ मुनिया याच्या कार्यालयात घूसून त्याच्यावर पाच गोळ्य़ा झाडण्यात आाल्या. गोळी झाडणारा दुसरा कोणी नाही तर जिग्नेश ठक्कर याचा मित्र गॅगस्टार नन्नू शहा होता. तीन साथीदाराच्या मदतीने बालपणीचा मित्र जिग्नेश याची हत्या नन्नूने केली. हत्येनंतर तो फरार झाला. काही लोक मध्ये येण्याचा प्रयत्न करणार तोच जो कोणी मध्ये येईल. त्याला ही ठोकू अशी धमकी दिली आणि आरामात कारमध्ये बसून पसार झाला. कल्याणचे महात्मा फुले पोलिस नन्नूच्या शोधात आहेत. मात्र गँगस्टार नन्नू पोलिसांच्या तावडीत सापडणार का हा खरा सवाल आहे.
धर्मेश उर्फ नन्नू शहा व मयत जिग्नेश उर्फ मुन्या ठक्कर हे दोघे मित्र होते .दोघांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. खंडणीच्या पैशावरुन दोघांमध्ये वाद झाला होता. एक गँगचे दोन तुकडे पडले होते. या खंडणीच्या पैशाच्या वाटणीतून दोघांमध्ये वाद सुरू झाले त्यातून दोघात खटके उडाले होते .त्यातूनच ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे.

error: Content is protected !!