कल्याण

कल्याण डोंबिवलीत 70 टक्के रुग्ण कोरोनामुक्त , आज 11 मृत्यूची नोंद आजमितीला 368 रुग्ण दगावले

कल्याण : कल्याण डोंबिवली दररोज सापडणाऱ्या दिवसागणिक वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात थोपवण्यात पालिका प्रशासणाला यश आले आहे .तर दुसरीकडे डिस्चार्ज चे प्रमाण 70 टक्क्यांच्या घरात पोचल्याने नागरिकांसह पालिकेच्या आरोग्य विभागाला दिलासा मिळाला आहे .आज नव्याने 303 कोरोना बाधित रुग्नांची नोंद झाली असून एकूण रुग्णसंख्या 20270 वर पोहचली तर मागील 24 तासात 417 रुग्णांना डिस्चार्ज आजमितीला 14257 रुग्णांची कोरोनावर मात केल्याने एकूण 70 टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे .दरम्यान अद्यापि 5645 रुग्ण विविध रुग्णालयात तसेच होम आयसोलेशन मध्ये उपचार घेत असून आतापर्यत 368 रुग्णांनी करोनामुळे जीव गमावला आहे. कोरोना मृत्यूचा एका दिवसातील आकडा 11 वर पोचला आहे. मात्र तरीही मृत्युदर आटोक्यात ठेवण्यात प्रशासनाला यश आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.  
रुग्णांचा तपशील
कल्याण पूर्व – 69, कल्याण पश्चिम – 78 ,डोंबिवली पूर्व – 58 ,डोंबिवली पश्चिम -67 ,मांडा टिटवाळा -07 , मोहने -24

error: Content is protected !!