उत्तर महाराष्ट्र क्रिडा जळगांव शिक्षण

गोदावरी आय एम आर सह विविध संस्थामध्ये क्रिडा दिन उत्साहात साजरा

जळगाव / प्रतिनिधी

गोदावरी आय एम आर महाविद्यालयात राष्ट्रीय क्रिडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तर गोदावरी सीबीएसई ऑनलाईन प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली.
हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीदिनी भारतात २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रिडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सोशल डिस्टंसिंग पाळत मेजर ध्यानचंद यांना आदराजली वाहण्यात आली. यावेळी संचालक डॉ. प्रशांत वारके, डॉ निलीमा वारके, प्रा.मकरंद गोडबोले, प्रा. चेतन सरोदे, प्रा. प्राजक्ता पाटील, प्रा. मेघा पाल, प्रा.भाग्यश्री पाटील, प्रा. हेमांगी महाजन, प्रा. आसिफ खान इ मान्यवर उपस्थीत होते. तसेच शिक्षक व विदयार्थीसाठी ऑनलाईन प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजीत करण्यात आली.ऑनलाईन वर विद्यार्थ्यांना डॉ वारके यांनी या दिनाचे महत्व विषद केले. यशस्वीतेसाठी क्रिडा संचालक प्रा. चंद्रकात डोगंरे, याच्या मार्गदर्शनानुसार दिपक दांडगे, सुरेश पाटील, योगेशराज नेतकर, जयश्री चौधरी, मयुर पाटील, प्रविण वाणी, स्वप्नील चौधरी, ललीत खडके, गणेश सरोदे, ललीत किरंगे, प्रफुल्ल भोळे, जिवन पाटील, घनश्याम पाटील, रूपेश पाटील यांनी परिश्रम घेतले.
गोदावरी सीबीएसईत ऑनलाईन प्रश्नमंजूषा स्पर्धा संपन्न
गोदावरी सीबीएसई तर्फे विदयार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली यात १ ली ते १० वीच्या विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवला. क्रिडाविषयक ज्ञान वाढवणे हाच उददेश समोर ठेवून विविध प्रश्न विचारले होते. शाळेच्या प्रिन्सीपल निलीमा चौधरी यांनी प्रारंभी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहीली. ऑनलाईन मार्गदर्शन करतांना त्यांनी मेजर ध्यानचंद हे हॉकीचे जादूगर होते असे सांगत या दिनाचे वैशिष्टे विषद केले.

error: Content is protected !!