आरोग्य जळगांव शिक्षण

*विद्यार्थाना व गरजू पालकांना स्व खर्चातून मास्क वाटप*

*विद्यार्थाना व गरजू पालकांना स्व खर्चातून मास्क वाटप*
एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रा. ही.जाजू विद्या मंदिराच्या ,मुख्याध्यापिका सौ. जयश्री कुलकर्णी मॅडम यांनी आपल्या स्वखर्चाने विद्यार्थी संख्ये एवढे ७००मास्क शिवून प्रत्येक विद्यार्थ्यांला आणि सोबत येणाऱ्या गरजवंत पालकांना मास्क वाटप केले. कोविड 19 चा प्रादुर्भाव सर्वदुर आहे, आपल्या विद्यार्थ्यांची आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे समजून मॅडम यांनी स्वतः जबाबदारीने हा उपक्रम हाती घेतला, शाळा बंद आहे पण नुकतेच शा. पो. आहार वाटप करण्यात आले. त्यावेळी विद्यार्थी पालक परिस्तिथी अभावी मास्क नवीन खरेदी करून घालणे टाळत आहे.
हे ओळखून मॅडम यांनी मास्क वाटपाचा चांगला उपक्रम राबविला. ह्या उपक्रमांचे पालक वर्गातून कौतुक व समाधान व्यक्त करण्यात येत आहे

error: Content is protected !!