उत्तर महाराष्ट्र जळगांव शिक्षण

श्रुती किशोर काळकर उच्च शिक्षणासाठी लंडन येथे रवाना.

श्रुती किशोर काळकर उच्च शिक्षणासाठी लंडन येथे रवाना.
प्रतिनिधी(कुंदन सिंह ठाकुर) – एरंडोल येथील अँड किशोरजी काळकर विभागीय संघटन मंत्री तथा जनजातीय महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख यांची सुकन्या.हिची उच्च शिक्षणासाठी युके येथील लंडन जवळील ब्रिस्टल येथील विश्व विद्यालय येथे काँंन्टम कम्प्युटर येथे मास्टर डिग्रीसाठी निवड झाली झाली आहे.
श्रुतीचे लहानपणीचे शिक्षण पहिली ते चौथीपर्यंत न्यू इंग्लिश मीडियम स्कूल एरंडोल, पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण काशिनाथ पलोड जळगाव येथे घेतले. गव्हर्मेंट पॉलीटेक्निक जळगाव येथे कंप्यूटर इंजिनियर म्हणून डिप्लोमाचे शिक्षण घेतले. पुढील शिक्षणासाठी पी.आय.सी. टी. पुणे येथे इंजिनीरिंग शिक्षण पूर्ण केले.रिफ्लेक्सीस या मल्टी नॅशनल कंपनी मध्ये दोन वर्ष नोकरी केली.तसेच नोकरी करत असताना सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून नोकरी केली नंतर जी.आर. ई.आणि टोफेल स्पर्धात्मक परीक्षा नोकरी करत असताना दिल्या. या स्पर्धात्मक परीक्षेच्या आधारावर जगातील 47 व्या असलेली युके येथील लंडन जवळील ब्रिस्टल येथील विश्व विद्यालय येथे काँंन्टम कम्प्युटर येथे मास्टर डिग्रीसाठी निवड झाली झाली आहे.तरी श्रुती ही उच्चशिक्षणासाठी दिनांक 21 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथून जाणार आहे.तिच्या यशाबद्दल भारतीय जनता पार्टी तर्फे तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, माजी मंत्री गिरीश महाजन,खासदार उन्मेष पाटील ,आमदार राजू मामा भोळे, आमदार मंगेश दादा चव्हाण ,माजी आमदार श्रीमती स्मिताताई वाघ, नाशिक विभागातील भारतीय जनता पार्टीतील कार्यकर्ते पदाधिकारी यांनी पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
फोटो – श्रुती काळकर.

error: Content is protected !!